advertisement

Dhule Result 2026 : निवडणूक हारल्याचा राग, BJP च्या पराभूत उमेदवाराकडून भाजप कार्यालयावर दगडेफक, धुळ्यात काय घडलं?

Last Updated:

धुळ्यात निवडणूक हारलेल्या एका भाजपच्या उमेदवाराने थेट भाजपच्याच कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे या हल्ल्यात भाजपच्या दोन महिला नेत्या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत.

Dhule Result 2026
Dhule Result 2026
Dhule Election Result 2026 : धुळ्यासह राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर आज या निवडणुकीचे निकाल हाती येतायत. या निकाला दरम्यान धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.धुळ्यात निवडणूक हारलेल्या एका भाजपच्या उमेदवाराने थेट भाजपच्याच कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे या हल्ल्यात भाजपच्या दोन महिला नेत्या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याच्या प्रभाग क्रमांत 16 या प्रभागातून आकाश शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत आकाश शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.त्यामुळे आकाश शिंदे यांना ही हार न पचल्यामुळे त्यांनी भाजपच्याच कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. आकाश शिंदे यांच्या समर्थकांनी चाळीसगाव रोज चौफुलीजवळ भाजप कार्यालयावर दगडफेक केली होती. या दगडफेकीत माजी उपमहापौरांसह कल्याणी अंपळकर यांना गंभीर दुखापत झाली आहे.या दुखापतीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhule Result 2026 : निवडणूक हारल्याचा राग, BJP च्या पराभूत उमेदवाराकडून भाजप कार्यालयावर दगडेफक, धुळ्यात काय घडलं?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement