शरद पवारांना धक्का, माजी आमदाराने साथ सोडली, जळगावची राजकीय समीकरणे बदलणार

Last Updated:

Jalgaon NCP: माजी आमदार दिलीप वाघ आणि पाचोऱ्याचे माजी नगराध्यक्ष संजय वाघ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

दिलीप वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश
दिलीप वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आणि पाचोऱ्याचे माजी नगराध्यक्ष संजय वाघ यांनी भारतीय जनता पक्षाने प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी मंत्री सतीश पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दिलीप वाघ हे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हुलकावणी देत दिलीप वाघ हे भाजपच्या गळाला लागले असून दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशामुळे पाचोरा भडगाव मतदार संघातील राजकीय सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
advertisement

शरद पवारांना धक्का, भाजपला फायदा, जळगावची गणिते बदलणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी दोन चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना माजी आमदार दिलीप वाघ आणि पाचोऱ्याचे माजी नगराध्यक्ष संजय वाघ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. परंतु दिलीप वाघ आणि संजय वाघ यांच्या प्रवेशाचा भाजपला मात्र फायदा होईल, असे सांगितले जाते.
advertisement

सत्तेत असल्याने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग

भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेत असल्याने, पक्षाकडे मुख्यमंत्रि‍पदासह इतरही महत्त्वाची मंत्रि‍पदे असल्याने पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. सत्तेचा फायदा घेण्याकरिता पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायेत. मुंबईत ठाकरेसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केले.

वाघ यांचा भाजप प्रवेश, गिरीश महाजन यांची एक्स पोस्ट

advertisement
मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात सन्मानाने स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, आमदार मंगेश चव्हाण तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांना धक्का, माजी आमदाराने साथ सोडली, जळगावची राजकीय समीकरणे बदलणार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement