Diwali 2024 : रेडिमेड किल्ल्यांचा वाढता ट्रेंड, फक्त 600 रुपयांपासून मिळतायत आकर्षक किल्ले
- Published by:Devika Shinde
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मावळ्यांच्या छोट्या मूर्तींची किंमत वीस रुपयांपासून सुरू होते. शिवाजी महाराजांच्या छोट्या-मोठ्या मूर्तीही इथं मिळतात. खरेदीवर डिस्काउंटची सोय आहे.
अपूर्वा तळणीकर-प्रतिनीधी, छत्रपती संभाजीनगर : दिवाळी आली की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच किल्ले बनवण्यात रमायचे. पण आता काळ बदलतोय. कंक्रीटच्या जंगलात मोकळ्या जागा कमी झाल्यानं किल्ले बनवणं कठीण झालंय. त्यामुळं आता रेडिमेड किल्ल्यांकडे लोकांचा कल वाढतोय.
छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगपुरा भागात, एस.बी. कॉलेजजवळ अशे सुंदर किल्ले मिळतात. इथे किल्ल्यांची किंमत ६०० रुपयांपासून सुरू होते आणि २७०० रुपयांपर्यंत जाते. खास म्हणजे हे किल्ले पीओपीचे असल्यानं पुढच्या वर्षीही वापरता येतात.
"आमच्याकडे किल्ल्यांसोबत डेकोरेशनच्या सगळ्या वस्तू मिळतात. मावळे, मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अशा सगळ्या गोष्टी इथं एकाच ठिकाणी मिळतात," असं विक्रेते राखी राठोड सांगतात.
advertisement
मावळ्यांच्या छोट्या मूर्तींची किंमत वीस रुपयांपासून सुरू होते. शिवाजी महाराजांच्या छोट्या-मोठ्या मूर्तीही इथं मिळतात. खरेदीवर डिस्काउंटची सोय आहे.
जरी आता किल्ले बनवण्याची परंपरा कमी होत चालली असली, तरी रेडिमेड किल्ल्यांमुळे दिवाळीतला किल्ल्यांचा आनंद कायम राहतोय. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही एक छान पर्याय ठरतोय. दिवाळीच्या दिवसांत किल्ल्यांना खूप मागणी असते. त्यामुळं लवकरात लवकर किल्ला खरेदी करणं फायद्याचं ठरतं. एस.बी. कॉलेजजवळच्या दुकानात सकाळी १० ते रात्री १० पर्यंत किल्ले मिळतात. परंपरेचं जतन करत नव्या काळाशी जुळवून घेण्याचा हा एक छानसा प्रयत्न म्हणता येईल. दिवाळीच्या सणाला किल्ल्यांची साथ कायम राहावी, हीच तर खरी महाराष्ट्राची ओळख!
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 28, 2024 4:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Diwali 2024 : रेडिमेड किल्ल्यांचा वाढता ट्रेंड, फक्त 600 रुपयांपासून मिळतायत आकर्षक किल्ले

title=दिवाळीसाठी या ठिकाणी खरेदी करा सुंदर असे रेडिमेट किल्ले 