पांढरं सोनं पाण्यात, अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला कापूस मातीमोल; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

Last Updated:

ऑक्टोबर महिन्यात मान्सून माघारी परतल्यानंतरही अवकाळी पाऊस पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांचं पांढरं सोनं काळवंडू लागलंय.

+
कापुस

कापुस

वारंवार येणारी संकटं काही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी आधीच हवालदिल झाला होता. त्यात ऑक्टोबर महिन्यात मान्सून माघारी परतल्यानंतरही अवकाळी पाऊस पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांचं पांढरं सोनं काळवंडू लागलंय.

एकीकडे दिवाळी उलटून न मिळालेली सरकारी मदत अन् दुसरीकडे लहरी निसर्गाची दगाबाजी. शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही हा उद्विग्न सवाल आता स्वतः शेतकरीच विचारू लागले. जालन्यातील नंदापुर गावातून लोकल १८ ने पावसामुळे कापूस पिकाच्या निकसानीचा घेतलेला हा आढावा... जालना शहरापासून केवळ १२ किमी अंतरावर असलेल्या नंदापुर गावात रविवारी रात्री ८ वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. दोन तास मुसळधार पावसाचे अक्षरशः झोडपून काढले.

advertisement

प्रकाश उबाळे यांच्या शेतात वेचणीस आलेलला जवळपास पाच क्विंटल कापूस भिजला. दिवाळाच्या आधीपासूनच दररोज सकाळी एकदा आणि रात्रीएकदा असा दिवसांतून दोन वेळा पाऊस येतो. घरी दिवाळीला लेकी बाळी आल्या आहेत. म्हणून कपसाचीवेचणी लांबली. जवळपास पाच क्विंटल कापूस शेतात भिजला. आता त्यातील सरक्यांना कोंब फुटले आहेत. बाजारात ३ हजार रुपये क्विंटल पण हा कापूस विकेल की नाही याची खात्री नाही.

advertisement

आम्ही करावं तर नक्की काय करावं. सरकार ने दिवाळी आधी मदत करू असं सांगितलं. पण दिवाळी होऊन गेली तरी एकही रुपया खात्यात जमा झाला नाही. लेकींना साडी न घेताच माहेरी पाठविण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी प्रकाश उबाळे यांनी सांगितले.

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पांढरं सोनं पाण्यात, अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला कापूस मातीमोल; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement