Railway Recruitment 2025: पूर्व मध्य रेल्वेमध्ये मेगाभरती, 10वी आणि ITI पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Last Updated:

Railway Recruitment 2025: ईस्ट सेंट्रल रेल्वेने नोकर भरतीची घोषणा केली आहे. ईस्ट सेंट्रल रेल्वेने 1149 पदांसाठी अप्रेंटिसशिप साठी अर्ज मागवले आहेत. शिकाऊ उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी म्हणता येईल.

Railway Ticket: रेल्वेचा प्रवास महागला! छ. संभाजीनगरहून मुंबई, दिल्लीसाठी किती मोजावे लागणार?
Railway Ticket: रेल्वेचा प्रवास महागला! छ. संभाजीनगरहून मुंबई, दिल्लीसाठी किती मोजावे लागणार?
अनेक तरुणांना सरकारी नोकरी करण्याची खूप इच्छा असते. आता या अशा तरुणांची लवकर इच्छा पूर्ण होणार आहे. ईस्ट सेंट्रल रेल्वेने नोकर भरतीची घोषणा केली आहे. ईस्ट सेंट्रल रेल्वेने 1149 पदांसाठी अप्रेंटिसशिप साठी अर्ज मागवले आहेत. शिकाऊ उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी म्हणता येईल.
ईस्ट सेंट्रल रेल्वेने जाहीर केलेल्या 1149 पदांची भरती अप्रेंटिसशिप साठी असणार आहे. इच्छुक उमेदवारांना रेल्वेच्या ecr.indianrailways.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येऊ शकणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2025 आहे. या भरतीच्या माध्यमातून संस्थेतील विविध रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल, ज्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. या भरतीच्या जाहिरातीची PDF फाईल बातमीत दिली आहे.
advertisement
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया, अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया आणि परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ईस्ट सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरणे महत्त्वाचे आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे, सर्व पात्र उमेदवारांनी या अंतिम मुदतीपूर्वी आपले अर्ज यशस्वी रित्या पूर्ण करून सबमिट करण्याचे आवाहन केले आहे. अर्जदार ईस्ट सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकणार आहेत.
advertisement
1149 पदांसाठी ईस्ट सेंट्रल रेल्वेने जाहीर केलेल्या नोकर भरतीमध्ये, संस्थेचे विविध युनिट्स आणि विभागांमध्ये नोकर्‍या उपलब्ध आहेत. मोठ्या संख्येने असलेल्या रिक्त जागांमुळे अनेक पात्र उमेदवारांना रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपच्या काळामध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. शैक्षणिक पात्रतेच्या निकषानुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून १०वी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. या परीक्षेत उमेदवाराला किमान 50% मिळणे आवश्यक आहे. या प्राथमिक शैक्षणिक पात्रतेसोबतच, उमेदवाराकडे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणेही अनिवार्य आहे. हे दोन्हीही निकष पूर्ण करणारे उमेदवारच या पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल. आयटीआय प्रमाणपत्र हे मान्यता प्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
advertisement
अर्जदाराची वयोमर्यादा किमान 15 वर्षे ते कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे. 15 वर्षापेक्षा कमी आणि 24 वर्षापेक्षा जास्त उमेदवाराचे वय नसावे. वयोमर्यादेची ही अट 25 ऑक्टोबर 2025 या कट- ऑफ तारखेनुसार तपासली जाईल. सरकारी नियमानुसार, काही विशिष्ट प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती भरतीच्या PDF जाहिरातीमध्ये उपलब्ध असेल. उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे अप्रेंटिसशिपसाठी निवड केली जाईल. ही गुणवत्ता यादी विशिष्ट विभाग किंवा युनिटसाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांमधून तयार केली जाईल. उमेदवारांच्या शैक्षणिक कामगिरीवर आधारित ही निवड प्रक्रिया असेल. गुणवत्ता यादी तयार करताना, उमेदवारांनी मॅट्रिक्युलेशन परीक्षेत (किमान 50% एकूण गुणांसह) आणि आयटीआय परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरी काढली जाईल.
advertisement
दोन्ही परीक्षांमधील गुणांना समान वेटेज (समान मुल्यांकन) दिले जाईल. या सरासरी गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ज्या उमेदवारांचे गुण अधिक असतील, त्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असेल. परीक्षेचे अर्ज शुल्क सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना 100/- रुपये भरावे लागतील. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग यांसारख्या पर्यायांचा वापर करता येईल. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती (PwBD) आणि महिला अर्जदारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. या प्रवर्गातील अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Railway Recruitment 2025: पूर्व मध्य रेल्वेमध्ये मेगाभरती, 10वी आणि ITI पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्जप्रक्रिया
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement