Ganesh Chaturthi 2025: बाप्पासाठी ट्रेंडी डेकोरेशनच्या शोधात आहात? पुण्यात मिळतंय इको-फ्रेंडली मखर, किंमत फक्त 400 रुपये
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सवात सजावटीसाठी थर्माकॉलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण, त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता आता लोक इको-फ्रेंडली सजावटीकडे वळत आहेत.
पुणे : गणेशोत्सवासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे घरगुती गणपतीसाठी आणि सार्वजनिक मंडळांसाठी आकर्षक सजावटीचे पर्याय शोधले जात आहेत. तुम्ही देखील बाप्पासाठी आकर्षक आणि पर्यावरणपूरक डेकोरेशन शोधत असाल तर रविवार पेठेत फेरफटका मारा. याठिकाणी पर्यावरणपूरक एमडीएफ (MDF) डेकोरेशन उपलब्ध आहेत. एमडीएफपासून तयार केलेल्या मखरच्या अनेक डिझाईन ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
एमडीएफ मटेरियलपासून तयार होणारी सजावट केवळ सुंदरच नाही तर टिकाऊ आणि सहज वापरता येण्यासारखी असल्याने गेल्या काही वर्षांत या डेकोरेशनला प्रचंड मागणी वाढली आहे. यामध्ये विशेषतः मखर (गणेशमूर्ती बसविण्याची सजावट) विविध आकार, डिझाईन्स आणि बजेटमध्ये उपलब्ध आहेत.
Ganesh Chaturthi 2025: पुण्यातील मानाच्या गणपतीचे दागिने कोण बनवतं? या दागिन्यांना परदेशातूनही मागणी
advertisement
रविवार पेठेतील साईनाथ फर्निचर या दुकानाचे मालक राजेश बढाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ते हा व्यवसाय करत आहेत. थर्माकॉलच्याऐवजी पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देणं, हे त्यांचं ध्येय आहे. एमडीएफ हे झाडाच्या लाकडापासून तयार होतं. त्यामुळे हे नैसर्गिक आणि इको-फ्रेंडली आहे. या मखरामध्ये स्वस्तिक, दगडूशेठ, हत्ती, राजवाडा असे 15 ते 20 डिझाईन्स असून त्यांची किंमत फक्त 400 रुपयांपासून सुरू होते. आसनाचे आकार एक फूटापासून ते चार फूटापर्यंत उपलब्ध आहेत.
advertisement
थर्माकॉलला निरोप, इको-फ्रेंडली सजावटीला पसंती
गणेशोत्सवात सजावटीसाठी थर्माकॉलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण, त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता आता लोक इको-फ्रेंडली सजावटीकडे वळत आहेत. एमडीएफ मटेरियलपासून तयार केलेली सजावट नुसतीच आकर्षक नाही तर ती दीर्घकाळ टिकणारी आहे. शिवाय वापरानंतर सहज फोल्ड करून ठेवता येते. पुढील वर्षी पुन्हा हीच सजावट वापरता येते परिणामी खर्चही कमी होतो.
advertisement
एमडीएफ मखरमध्ये पारंपरिक ते आधुनिक अशा अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. राजवाड्यासारखी भव्य रचना असो किंवा छोटेखानी स्वस्तिक पॅटर्न असलेलं मखर, प्रत्येक डिझाईन वजनाला हलकं आणि मजबूत बांधणीचं आहे. गेल्या काही वर्षांत पुण्यातील ग्राहकांमध्ये एमडीएफ सजावटीची मागणी झपाट्याने वाढली आहे. थर्माकॉलऐवजी लाकडापासून बनवलेली सजावट निवडल्यामुळे सण साजरा करताना पर्यावरणावर भार टाळता येतो, असं राजेश बढाई म्हणाले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 19, 2025 3:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Chaturthi 2025: बाप्पासाठी ट्रेंडी डेकोरेशनच्या शोधात आहात? पुण्यात मिळतंय इको-फ्रेंडली मखर, किंमत फक्त 400 रुपये








