बनावट इनपुट क्रेडिट टॅक्स रॅकेटचा पर्दाफाश, ४७ कोटींचा घोटाळा,GST विभागाची मोठी कारवाई
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Thane News: बनावट कंपन्या दाखवून वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता फसवणूक करून आयटीसीचा दावा केला आणि तो पास केला होता हे तपासात उघड झाले.
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : कोट्यवधी रुपयांच्या बनावट इनपुट क्रेडिट टॅक्स रॅकेटचा पर्दाफाश करीत ठाणे जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४७.३२ कोटी रुपयांच्या इनपुट क्रेडिट टॅक्स घोटाळा यानिमित्ताने उघडकीस आला आहे.
मेसर्स केएसएम एंटरप्रायझेसचे विवेक राजेश मौर्य याला GST विभागाने अटक केली आहे. बनावट कंपन्या दाखवून वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता फसवणूक करून आयटीसीचा दावा केला आणि तो पास केला होता हे तपासात उघड झाले.
विवेक मौर्य याच्याकडून बँक पासबुक, चेक-बुक, अनेक मोबाईल फोन आणि अनेक फसव्या कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे असे गुन्हेगारी पुरावे जप्त करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आरोपी विवेक मौर्य याने केली शासनाची फसवणूक केली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 20, 2025 10:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बनावट इनपुट क्रेडिट टॅक्स रॅकेटचा पर्दाफाश, ४७ कोटींचा घोटाळा,GST विभागाची मोठी कारवाई


