धक्कादायक! बॅडमिंटन खेळताना खाली कोसळले; भंडाऱ्यात माजी पोलिस अधिकाऱ्याचा जागेवर मृत्यू

Last Updated:

बॅडमिंटन खेळताना ह्रदयविकाराचा झटक्याने एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

News18
News18
भंडारा : माणसाचं जीवन धकाधकीचं बनलं असून वेळेअभावी माणूस शरिराकडे, प्रकृतीकडे लक्ष देत नसल्याची ओरड सातत्याने ऐकायला मिळते. मात्र, काहीजण आपल्या तब्येतीकडे अधिक काळजीपूर्वक लक्षही देत असतात. त्यानुसार, दैनंदिन व्यायामासाठी किंवा योगासनाद्वारे आपले शरीर तंदूरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यापूर्वीही काहीवेळा जिममध्ये ट्रेनर किंवा जिममध्ये व्यायाम करताना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान अशीच एक घटना भंडाऱ्यात घडली आहे. बॅडमिंटन खेळताना ह्रदयविकाराचा झटक्याने एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा स्टेडियमवर ही घटना घडली आहे. बाजीराव चिंधालोरे (60 वर्षे) असे सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे नाव होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी डॉ. झंवर यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला होता.
advertisement

खेळताना अचनाक कोसळले

समोर आलेल्या माहितीनुसार, बाजीराव चिंधालोरे यांना बॅडमिंटन खेळण्याची आवड होती. निवृत्त झाल्यानंतर रोज बॅडमिंटनन खेळण्यासाठी येत होते. रोज नित्यनियमाने बॅडमिंटन खेळायचे. मात्र खेळता खेळता अचनाक खाली कोसळले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

चिंधलारे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर 

रोज उत्साहात खेळणारे बाजीराव चिंधलारे खेळताना एकदत तंदुरुस्त आणि फिट होते. विशेष म्हणजे त्यांची शरीरयष्टी पाहून असा काही प्रकार घडेल असे कोणालाही वाटत नाही.
advertisement
खाली कोसळतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होते. या अकस्मात निधनामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला असून चिंधलारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धक्कादायक! बॅडमिंटन खेळताना खाली कोसळले; भंडाऱ्यात माजी पोलिस अधिकाऱ्याचा जागेवर मृत्यू
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement