6 राज्यांमध्ये हैदोस, 3 कोटींचं बक्षीस असलेला जहाल माओवादी ठार, सुरक्षा दलाची मोठी कारवाई
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गडचिरोलीतील चकमकीत 3 कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादी गजर्ला रवी ऊर्फ गणेश ठार. माओवादी संघटनेला मोठा धक्का. अरुणा नावाची माओवादी महिला देखील ठार.
महेश तिवारी, प्रतिनिधी गडचिरोली: छत्तीसगड इथे नक्षलवादी आणि जवान यांच्यात कारवाई सुरू आहे. जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 कोटी रुपयांचं बक्षीस अलेला नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारडपलीच्या घनदाट जंगलात ही चकमक सुरू होती. आज सकाळी माओवाद विरोधात झालेल्या चकमकीत तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
यामध्ये माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि तब्बल तीन कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी गजर्ला रवी ऊर्फ गणेश याला ठार करण्यात जवानांना यश आलं. त्याला ठार केल्यामुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे.मारडपलीच्या दुर्गम वनक्षेत्रात भागात जवान आणि माओवाद्यांमुळे मोठी चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, तीन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
advertisement
ठार झालेल्यांमध्ये गजर्ला रवी ऊर्फ गणेश हा प्रमुख होता. तेलंगणाचा मूळ रहिवासी असलेल्या रवी ऊर्फ उदय याच्यावर आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि झारखंड या सहा राज्यांमध्ये मिळून तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
रवी माओवाद्यांच्या आंध्रा-ओरिसा बॉर्डर समितीचा सचिव तसंच आंध्र प्रदेश स्पेशल झोनल समितीचा सदस्य म्हणूनही कार्यरत होता. तीन राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये त्याचा मोठा प्रभाव होता. त्याच्या मृत्यूनंतर माओवादी संघटनेचे मोठे नुकसान झाल्याचं मानलं जात आहे. या चकमकीत ठार झालेली दुसरी महत्त्वाची माओवादी महिला आहे. या महिलेचं नाव अरुणा आहे. ती माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्याची पत्नी होती. तसेच, ती वरिष्ठ माओवादी नेता चेरकुरी राजकुमार ऊर्फ आझादची बहीण होती. तिच्यावरही 50 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलं होतं.
Location :
Gadchiroli,Gadchiroli,Maharashtra
First Published :
June 18, 2025 10:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
6 राज्यांमध्ये हैदोस, 3 कोटींचं बक्षीस असलेला जहाल माओवादी ठार, सुरक्षा दलाची मोठी कारवाई