भरत कराड यांच्या कुटुंबाला 25 लाख आणि सरकारी नोकरी द्या, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
भरत कराड यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरी द्या, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
बीड: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली आहे. आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या सुरू असलेल्या मागणीमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल अशी भीती ओबीसी समाजाला वाटत आहे. याच भीतीमुळे एका 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले, भरत महादेव कराड (३५) असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान भरत कराड यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरी द्या, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
भरत महादेव कराड हा युवक ऑटो चालवून किंवा इतर वाहनांवर चालक म्हणून काम करणारा तरूण असला तरी तो गेली काही वर्षांपासून ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात प्रत्येक आंदोलनात हिरीरीने भाग घेवून सहभागी होत होता. सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून ओबीसींचे आरक्षण कायमस्वरूपी संपविले आहे. मी वेळोवेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला व ओबीसी समाजाला न्याय मिळावा असा मजकूर त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आहे.
advertisement
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याचे नैराश्य मनात बाळगून आत्महत्या केलेल्या स्व. भरत महादेव कराड यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत पात्रतेनुसार नोकरी मिळवून द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे राज्याचे देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी केली आहे.
advertisement
भरत कराड यांच्या पश्चात कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार असून त्यांच्या या बलिदानाने उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला राज्य सरकार न्याय देईल, असा विश्वास आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 7:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भरत कराड यांच्या कुटुंबाला 25 लाख आणि सरकारी नोकरी द्या, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी