कुरिअरने ५० किलो चांदी मागवली, एकाने ३० किलो पळवली, पोलिसांनी चक्रे फिरवली अन्...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Gondia News: अवघ्या ४८ तासांत गोंदिया पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीला शोधून काढत जवळपास ३८ लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
रवी सपाटे, प्रतिनिधी, गोंदिया : गोंदियात ३० किलो चांदीसह ३८ लाखांचा मुद्देमाल ४८ तासांत पोलिसांनी जप्त केला. गोंदिया पोलिसांनी अतिशय जलद कारवाई करून गुन्ह्यातील आरोपीला अटक केली.
गोंदिया शहरातील रोहित ज्वेलर्स यांनी मोबाईल अँप द्वारा राजकोट येथून ५० किलो चांदी खरेदी केली होती. कुरियरने ५० किलो चांदीचे दोन पार्सल पाठवविले. २० किलो आणि ३० किलो अशी एकूण ५० किलो चांदीही कुरियरने पाठवण्यात आली होती. २० किलो चांदी पार्सलद्वारे प्राप्त झाली. मात्र उर्वरित ३० किलो चांदी ही त्यांना मिळाली नव्हती. याविषयी दुकानदाराने सिटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
advertisement
या चोरी प्रकाराचा ४८ तासात शहर पोलिसांनी छडा लावण्यात यश आले आहे. त्यातील ३० किलो चांदीचे एक पार्सल अंदाजे ३८ लाख रुपये किमतीचे होते. अज्ञात व्यक्तीकडून अफरातफर करण्यात आली होती. या गुन्ह्याची नोंद होताच डीबी पथकाने कसून तपास करून जिया अली सय्यद (रामनगर बाजार चौक गोंदिया) या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरी गेलेले संपूर्ण पार्सल सहित चांदी तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त करण्यात आली आहे. याविषयी अधिक तपास गोंदिया शहर पोलीस स्टेशन करीत आहे..
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
September 22, 2025 4:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुरिअरने ५० किलो चांदी मागवली, एकाने ३० किलो पळवली, पोलिसांनी चक्रे फिरवली अन्...