Gondia : अर्धवट बांधकामाचे लोकार्पण करण्यासाठी आले आमदार, ग्रामस्थांनी पाठवलं परत

Last Updated:

गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे हे सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी या गावात उपसा सिंचनाचे लोकार्पणसाठी पोहोचले होते.

News18
News18
रवी सपाटे, गोंदिया, 06 सप्टेंबर : अर्धवट असलेल्या सिंचन बांधकामाचे लोकार्पण करण्यासाठी गेलेल्या आमदाराला गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. आमदाराला गावकऱ्यांनी लोकार्पण न करताच परत पाठवलं. सरपंच आणि गावकऱ्यांना विश्वासात न घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्यांना गावात प्रवेश करू देणार नाही असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे हे सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी या गावात उपसा सिंचनाचे लोकार्पणसाठी पोहोचले होते. मात्र ग्रामस्थ हे अपूर्ण काम झाले असल्याने ग्रामपंचायत ला विश्वासात न घेतल्याने आणि शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत नसल्याने गावकरी आमदाराच्या विरोधात होते. गावकऱ्यांनी मार्गावरील झाडे तोडून रस्त्यावर ठेवत रस्ता रोको केला. तसेच गावकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यास सुरुवात केली. आमदाराला गावात येऊच दिले नाही.
advertisement
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सालेकसा विधानसभाचे काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे हे सध्या भूमिपूजन व अपूर्ण कामाच्या उद्घाटनामुळे चर्चेत आहेत. असाच एक प्रकार सालेकसा तालुक्‍यातील गावत उघडकीस आले. पांढरवानीत उपसा सिंचनचे कुणालाही न सांगता लोकार्पण करण्यासाठी ते आले होते. तेव्हा संतप्त गावकरी आणि शेतकऱ्यांनी गावाच्या रस्त्यावर झाडे कापून रस्त्ता अडवला व काळे झेंडे दाखवित आणि घोषणाबाजी करण्यात आली. लोकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे लोकार्पण न करता आमदारांना परत जावं लागलं.
advertisement
ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, परिसरातील आमदार कधीच नाही येत. ते केवळ निवडणुकीच्या वेळीच दिसतात आणि भूमिपूजन किंवा अपूर्ण उद्घाटनासाठी आमदार येतात. शेतकरी व ग्रामस्थ हे आमदार कार्यालयातील समस्यांसाठी जाऊन अर्ज केला या सह जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही यासंदर्भात विनंती केली केली होती. पण शेतकरी व ग्रामस्थांच्या विविध समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पांढरवाणीचा उपसा सिंचनाच्या लोकार्पण वेळी काळे झेंडे दाखवून मुर्दाबाद घोषणाबाजी करत आमदार ना रिकाम्या हाताने परतवले आणि प्रथम उपसा सिंचनचे पाणी जो पर्यंत शेतात येत नाही. तो पर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना व प्रतिनिधींना गावात प्रवेश करू देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia : अर्धवट बांधकामाचे लोकार्पण करण्यासाठी आले आमदार, ग्रामस्थांनी पाठवलं परत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement