गोंदियामध्ये ग्रामसेवकाला चोप; खांबाला बांधून ठेवले, ग्रामस्थांकडून गंभीर आरोप
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकांनी ग्रामसेवकाला चोप देत गावातील मुख्य चौकात असलेल्या विद्युत पोलला बांधून ठेवले.
गोंदिया, रवी सपाटे, प्रतिनिधी : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकांनी ग्रामसेवकाला चोप देत गावातील मुख्य चौकात असलेल्या विद्युत पोलला बांधून ठेवल्याचं समोर आलं आहे, याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. गोंदिया तालुक्यातील नवरगाव (कला) येथील ही घटना आहे. चौधरी असं या ग्रामसेवकाचं नाव आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया तालुक्याअंतर्गत येत असलेल्या नवरगाव येथे ग्रामसेवकाला गावातील नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचा व गावातील मुख्य चौकात असलेल्या विद्युत पोलला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चौधरी असे या वादग्रस्त ग्रामसेवकाचे नाव आहे. ग्रामस्थांकडून या ग्रामसेवकावर गंभीर आरोप करत त्याला मारहाण करण्यात आली आहे.
चौधरी हा सायंकाळी आठच्या सुमारास गावात दारूच्या नशेत आला. त्यानंतर एका महिलेच्या घरात जाऊन त्याने महिलेचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेनं आरडाओरड केल्यानं तिच्या मदतीसाठी तिच्या घरच्यांनी धाव घेतली, असा आरोप ग्रामस्थानी केला आहे.
advertisement
त्यानंतर गावातील नागरिकांनी या ग्रामसेवकाला भर चौकात चांगलाच चोप दिला व हायमास्ट लाईटच्या खांबाला बांधून ठेवले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत ग्रामसेवकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवले, दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
view commentsLocation :
Gondiya,Gondiya,Maharashtra
First Published :
August 22, 2024 7:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
गोंदियामध्ये ग्रामसेवकाला चोप; खांबाला बांधून ठेवले, ग्रामस्थांकडून गंभीर आरोप


