सतांपजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन् मग..; गोंदिया हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे, शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे.
गोंदिया, रवी सपाटे, प्रतिनिधी : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकानेच विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवून लज्जास्पद कृत्य केलं. दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर येताच आरोपीविरोधात तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या शिक्षकाचं निलंबन देखील करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकानं आपल्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. त्याने तिच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडील क्लिप दाखवल्या तसेच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या मुलीच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरोधात तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 22 ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर ती आपल्या घरी गेली, त्यानंतर तिच्या शाळेतील शिक्षक उमेश टीकाराम मेश्राम वय 50 वर्ष हा तिच्या घरी आला. त्याने या मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवली, मुलीने व्हिडीओ क्लिप पाहाण्यास नकार देताच त्याने पीडितेचे केस धरून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
Location :
Gondiya,Gondiya,Maharashtra
First Published :
September 01, 2024 8:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
सतांपजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन् मग..; गोंदिया हादरलं


