'अण्णा माझा विठ्ठल!' म्हणणाऱ्या गोट्या गीत्तेचा नवा व्हिडीओ, वाल्मिकच्या मुलांसोबतही पक्की यारी
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वाल्मिक कराडच्या लहान मुलाचा गोट्या गित्तेला केक भरवतानाचा व्हिडीओ समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
बीड : महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड टोळीतील गोट्या गित्तेचा नवा व्हिडीओ समोर आल्यानं खळबळ उडालीय यात वाल्मीक कराड चा मुलगा श्री कराड गोट्याला केक भरवताना दिसत आहे. महादेव मुंडेंशी ना ओळख ना कधी पाहिलं… असा दावा वाल्मिक कराडच्या मोठ्या मुलाने केला. त्यानंतर आता कराडच्या लहान मुलाचा गोट्या गित्तेला केक भरवतानाचा व्हिडीओ समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्ते खुलेआम व्हिडिओ तयार करून धमक्या देतोय, मात्र पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नाही. मकोकातील वॉन्टेड असलेल्या गोट्यावर तब्बल 18 गुन्हे दाखल आहेत. वाल्मीक कराडच्या टोळीतील गोट्या गित्तेनं आतापर्यंत अनेक गुन्हे केलेत.वाढदिवसाचा नवा व्हिडीओ समोर आल्याने गोट्या गीते आणि श्री कराड यांचे संबंध यावरून स्पष्ट होत आहेत.
advertisement
गोट्या गीत्ते वाल्मिकचा फॅन
विशेष गोट्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर परळीचे किंग नावाने अनेक व्हिडिओ अपलोड आहेत. यात श्री कराड आणि सुशील कराड यांचे व्हिडीओ आहेत.तसंच वाल्मिक कराड सोबतचे व्हिडिओ देखील आहेत. वाल्मिक कराड माझा विठ्ठल, सरकार, परळीचे king अशी वेगवेगळ्या व्हिडीओ आहेत.
वाल्मिकच्या मुलांसोबत गोट्या गित्तेचे अनेक व्हिडीओ
वाल्मिक कराडचा लहान मुलगा, मोठा मुलगा आणि गोट्या गीते यांचे फोटो व्हिडिओ दिसत आहेत. गोट्या गीत्तेवर अनेक गुन्हे असताना गोट्या राजरोस पोलिसांसोबत, वाल्मिक कराड यांच्या समवेत, तर परळी मधील राजकीय कार्यक्रमातही सहभागी कसा झाला? असे अनेक प्रश्न या व्हिडीओनंतर उपस्थित होत आहेत.
advertisement
Gotya Gitte | गोट्या गीत्तेचा नवा व्हिडीओ समोर pic.twitter.com/emAgZrwDDL
— News18Lokmat (@News18lokmat) August 5, 2025
गोट्या गित्ते कधी सापडणार?
परळी आणि संपूर्ण परिसरात दहशत निर्माण करणारा आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्ते व्हिडीओच्या माध्यमातून धमक्या देतोय. तरीही पोलीस गित्तेला अजून शोधू शकलेले नाहीत. पोलीस आणि एसआयटीला गोट्या गित्ते सापडत नाही, हे यंत्रणेचं मोठं अपयश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 05, 2025 5:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अण्णा माझा विठ्ठल!' म्हणणाऱ्या गोट्या गीत्तेचा नवा व्हिडीओ, वाल्मिकच्या मुलांसोबतही पक्की यारी









