OBC Melava : दोन महिन्यात दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या, छगन भुजबळांची मोठी मागणी

Last Updated:

OBC Melava : हिंगोली येथील मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

जरांगे पाटील-भुजबळ
जरांगे पाटील-भुजबळ
हिंगोली, 26 नोव्हेंबर : सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तयार होताना पाहायला मिळत आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध करत राज्यभर मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. आज हिंगोलीत ओबीसी सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी दोन महिन्यात दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या. शिंदे समिती रद्द करा, अशा मागण्या छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यातून केल्या आहेत.
काय म्हणाले छगन भुजबळ?
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांकडून प्रचंड विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आपला विरोध दाखवण्यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभरात सभा घेण्यात येणार आहे. यासाठी पहिला सभा जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये झाली, तर दुसरी सभा आज हिंगोलीत होत आहे. या सभेला छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, अपेक्षेप्रमाणे भुजबळ यांच्याकडून जरांगे यांच्यावर टीका देखील करण्यात आली असल्याचे पाहायला मिळत आहे.
advertisement
कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या : छगन भुजबळ
भुजबळ म्हणाले, की तुमचा समाज पुढे आहे, म्हणून आमच्यावर बुलडोजर चालवू नका. गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या पण आमच्यावर बुलडोझर चालवू नका. शिंदे समिती निर्माण केली ती रद्द करा. यांना अधिकार नाही. दोन महिन्यांत कुणबी नोंदीनुसार दिलेल्या प्रमाणपत्रांना स्थगिती द्या. केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण करू नका. इतर समाजाचेही करा. त्यानुसार कसे कळेल, कोण पुढे आणि कोण मागे. मंडल आयोगाने सांगितले आम्ही 54 टक्के आहोत. सगळे म्हणतात जनगणना करा, मग करा ना. होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. बिहार करू शकतं तर महाराष्ट्र का नाही? जे होईल ते आम्हाला मान्य आहे. आम्हाला लढायचे आहे, दूरपर्यंत लढायचे आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
advertisement
गावबंदी करणाऱ्यांना शिक्षा द्या
मराठा समाजाने राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. यावर भुजबळ म्हणाले, की पोलिसांना आणि सरकारला सांगतोय. जर कोणाला तुम्ही गाबंदी केली तर शिक्षा असते. सरकार, पोलीस हे करणार का? आज संविधान दिवस आहे. ज्यानी बोर्ड लावले, त्यांना एक महिना शिक्षा द्या. आमचा विरोध झुंडशाहीला आहे. त्या बेदरेकडे पिस्तोल सापडला. तरीही त्याला पोलीस कस्टडी मिळाली नाही. आपण सगळे नेते आपापसातले मतभेद दूर करुन एकत्र या, आवाज बुलंद करा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
OBC Melava : दोन महिन्यात दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या, छगन भुजबळांची मोठी मागणी
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement