Babanrao Taywade : ओबीसींविरुद्ध बोलाल तर हातपाय कापू; OBC नेत्यावर गुन्हा दाखल होताच म्हणाले, मी घाबरत नाही
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
गुन्हा दाखल झाल्यानंतर बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तक्रार दाखल झाली तरी मी त्याला घाबरत नाही असं त्यांनी म्हटलंय.
मनीष खरात, हिंगोली, 01 डिसेंबर : ओबीसी एल्गार महामेळाव्यात ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी त्यांच्याविरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत झालेल्या ओबीसी महाएल्गाल मेळाव्यात बबनराव तायवडे म्हणाले होते की, ओबीसींविरोधात बोललात तर हातपाय कापून टाकू. आता या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तक्रार दाखल झाली तरी मी त्याला घाबरत नाही असं त्यांनी म्हटलंय.
बबनराव तायवाडे यांनी म्हटलं की, तक्रार जरी दाखल झाली असली तरी मी त्याला घाबरत नाही. जरांगे यांनी ओबीसी समजाची लायकी काढली. तेव्हा मला समाजातील अनेक लोकांचे फोन आले. आपली लायकी काढली त्यामुळे त्याला उत्तर देताना माझ्या तोंडून ते शब्द निघाले होते. मात्र मी माझे शब्द परत घेतले होते असंही तायवाडे यांनी स्पष्ट केलं.
advertisement
माझ्या वर गुन्हा दाखल झाला असला तरी मी घाबरत नाही. मला कारावास झाला तरी चालेल. आमच्या विरोधात बोलले जात असेल तर एससी समाजाच्या लोकांनी त्यांच्या विरोधात अट्रोसिटी चां गुन्हा दाखल केला तर चालेल का? असा संघर्ष होऊ नये अस आवाहन मी करतो. मी ओबीसी समाजाचां लढा देत आहे त्यासाठी मला कुठलीही किंमत मोजावी लागली तरी मी तयार असल्याचं तायवाडे यांनी म्हटलं.
advertisement
काय म्हणाले होते बबनराव तायवाडे?
view commentsजरांगे पाटलांचा मी निषेध करतो, धिक्कार करतो. आतापर्यंत आम्ही गप्प होतो. पण ज्या दिवशी आमचा अपमान होईल तेव्हा तो सहन करणार नाही. यानंतर ओबीसींविरोधात कोणी बोलण्याची हिंमत केली तर त्याचे हातपाय कापून टाकू. आम्ही ६० टक्के लोकं आहोत आणि आमचा अपमान आम्ही सहन करणार नाही याची जरांगेंनी दखल घ्यायला हवी असं तायवाडे म्हणाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2023 12:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Babanrao Taywade : ओबीसींविरुद्ध बोलाल तर हातपाय कापू; OBC नेत्यावर गुन्हा दाखल होताच म्हणाले, मी घाबरत नाही


