भुमरेंचा राऊतांना खोचक टोला, म्हणाले उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी...
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हिंगोली, 17 सप्टेंबर, मनीष खरात : शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत फक्त देखावा करतात, उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी त्यांना नाटकं करावी लागतात, नुसत्या वल्गना करून चालत नाही, त्यांनी पत्रकार परिषदेला यायला हवं होतं, असा खोचक टोला संदीपान भुमरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले भुमरे
शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीवरून संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना संदीपान भूमरे यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत फक्त देखावा करतात, ते उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी नाटक करतात, नुसत्या वल्गना करून चालत नाही, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेला यायला हवं होतं, असं संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. आता संजय राऊत हे भुमरेंच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
दरम्यान संजय राऊत आणि शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे. शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होती. या पार्श्वभूमीवर काही प्रमुख मंत्री शुक्रवारी रात्रीच शहरात दाखल झाले होते. संजय राऊत हे देखील त्यावेळी छत्रपती संभाजीनगरातच होते. यावेळी संजय राऊत आणि संजय शिरसाट यांची भेट झाली. मात्र यावेळी दोन्ही नेत्यांनी काढता पाय न घेता, एकमेंकांना हस्तांदोलन केल्याचं पहायला मिळालं. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
Location :
Hingoli,Hingoli,Maharashtra
First Published :
September 17, 2023 12:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
भुमरेंचा राऊतांना खोचक टोला, म्हणाले उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी...