Hingoli News : 'तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू आणि..' विधानसभेआधी बच्चू कडूं यांचं मोठं विधान

Last Updated:

Hingoli News : आगामी विधानसभेच्या दृष्टीकोनातून प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन रणशिंग फुंकलं आहे.

News18
News18
हिंगोली, (मनीष खरात, प्रतिनिधी) : विधासभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. अशात प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. तर दुसरीकडे राजकीय आखाड्यालाही चांगलाच रंग चढताना पाहायला मिळत आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी आत्ताच मोठं विधान करत सर्वांना इशारा दिला आहे. आपले दोन आमदार विधानसभेत सत्ताधाऱ्यांना घाम फोडतात. जर आपले 20 आमदार आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू आणि समुद्रात नेऊन टाकू, असं विधान बच्चू कडू यांनी केलं. ते हिंगोलीच्या कळमनुरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
काय म्हणाले बच्चू कडू?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी रणशिंग फुंकलं आहे. "आपले दोन आमदार आहेत तर विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहत नाही. जर आपले 20 आमदार आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू आणि समुद्रात नेऊन टाकू, त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे, असे विधान आमदार बच्चू कडू यांनी हिंगोलीच्या कळमनुरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले.
advertisement
आमदार संतोष बांगर यांच्यावर बोलताना बच्चू कडू यांची जीभ घसरली
शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांच्यावर बोलताना आमदार बच्चू कडू यांची जिभ घसरली. ते म्हणाले, की आपली लढाई गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्याची आहे, 50 माणसं घेऊन जाणाऱ्या एसटीच्या ड्रायव्हरला 12 हजार रुपये महिना आणि 1 माणूस घेऊन जातो त्या कलेक्टरच्या ड्रायव्हरला 45 हजार रुपये महिना भेटतो. अरे सालेहो तुम्हारे बाप का राज है, बच्चू कडू अभी जिंदा है, उखाड के फेकना है इन लोगो को, तुमच्या बापाचं राज्य आहे का? तुमचा संडास पाच लाखांचा आणि आमचं घर सव्वा लाखांचं. लाज नाही वाटत का नाही तुम्हाला? हे कोणी विचारत नाही, घेतली कावड की निघाला महादेवाला अरे महादेव त्रिशुळ घालील की *** असे म्हणत बच्चू कडू यांनी आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता टीका करताना त्यांची जीभ घसरली.
मराठी बातम्या/हिंगोली/
Hingoli News : 'तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू आणि..' विधानसभेआधी बच्चू कडूं यांचं मोठं विधान
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement