Accident News : कुत्र्याला वाचवताना सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, चारजण ठार

Last Updated:

Solapur Accident : सफारी आणि ग्रँड विटारा या दोन गाड्यांचा या अपघातात समावेश आहे. दिवाळी सणातच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कुत्र्याला वाचवताना दोन वाहनांचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर, 4 ठार, सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील घटना
कुत्र्याला वाचवताना दोन वाहनांचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर, 4 ठार, सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील घटना
धाराशिव : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी उमरगा तालुक्यातील डाळिंब जवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सफारी आणि ग्रँड विटारा या दोन गाड्यांचा या अपघातात समावेश आहे. दिवाळी सणातच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार, सफारी गाडी चालवत असताना अचानक रस्त्यावर एक कुत्रा आला. त्यावेळी चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारवरील नियंत्रण सुटल्याने सफारी गाडीने डिव्हायडर ओलांडला. यामुळे कार ही विरुद्ध लेनमध्ये शिरली. त्याचवेली समोरून येणाऱ्या ग्रँड विटारा गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. अपघाताची घटना घडल्यानंतर स्थानिकांसह इतरांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर मदत कार्याला वेग आला.
advertisement
या दुर्घटनेत बिदर (कर्नाटक) येथील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सोलापूर येथील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत व्यक्ती खासमपूर (बिदर) येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
दिवाळीच्या निमित्ताने आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे अनेकजण पर्यटन, देवदर्शन, गावी जाण्यासाठी निघाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील झाली आहे. त्याशिवाय, काही ठिकाणी अपघात ही झाल्याचे वृत्त समोर आले आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident News : कुत्र्याला वाचवताना सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, चारजण ठार
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement