पुण्याला जायचंय म्हणत कारमध्ये बसवलं, तरुणाने मित्राच्या मदतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू, नगरच्या वर्षासोबत काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Husband Killed Wife: कोपरगाव तालुक्यातील डाऊच शिवारात 8 ऑगस्ट रोजी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता.
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर : कौटुंबिक वादाचा राग मनात धरून पतीने आपल्या साथीदाराच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी पतीला बेड्या ठोकत हत्येचा छडा लावलाय.
नेमकं प्रकरण काय ?
कोपरगाव तालुक्यातील डाऊच शिवारात 8 ऑगस्ट रोजी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झालं होतं. संबंधित महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होतं. त्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी परिसरातील पेट्रोल पंपावर चौकशी करत आणि सीसीटीव्ही फूटेज तपासत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला.
advertisement
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यात मृतदेहाशी मिळत्या जुळत्या महिलेची मिसिंग तक्रार दाखल आहे का? यासंदर्भात माहिती पोलीस गोळा करत होते. याच दरम्यान संजय उर्फ बापू मोहिते नामक व्यक्ती घरातून गायब असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलीस या मिसिंगचा तपास करत असताना संशय बळावला आणि खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली. अर्धवट जळालेला मृतदेह हा वनिता उर्फ वर्षा संजय मोहिते हिचा असल्याचे आणि पती संजय याने साथीदाराच्या मदतीने तिचा खून केल्याचे समोर आले.
advertisement
खूनाची लिंक सापडताच पोलिसांनी आरोपी पती संजय मोहिते याला राहाता तालुक्यातील सावळीविहीर हद्दीतून ताब्यात घेतलं. मोहिते पती पत्नीमध्ये सातत्याने कौटुंबिक वाद होत असल्याने अनेक दिवसांपासून पत्नी वनिता वेगळी रहात होती. त्यामुळे आरोपी पतीने तिला पुण्याला जायचंय, असं सांगून साथीदाराच्या मदतीने वनिताचा गळा आवळला. तसेच चाकूने वार करून तिला तिची हत्या केली पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकीतील पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली आरोपी पती संजय मोहिते याने पोलिसांना दिली आहे..
advertisement
आरोपी संजय याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली असून त्याच्या फरार असलेल्या साथीदाराचा शोध कोपरगाव पोलीस घेत आहेत. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असतानाही पोलिसांनी अवघ्या काही दिवसात खुनाचा उलगडा करत आरोपीला गजाआड केल्याने कोपरगाव शहर पोलिसांच्या कामाचे कौतुक होत आहे...
Location :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
August 14, 2025 1:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्याला जायचंय म्हणत कारमध्ये बसवलं, तरुणाने मित्राच्या मदतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू, नगरच्या वर्षासोबत काय घडलं?