IAS प्रविण पुरी यांना दणका, थेट निलंबनाची कारवाई, सभापती राम शिंदेंचे आदेश, प्रकरण नेमके काय?

Last Updated:

IAS Pravin Puri Suspension Order: दरेकर यांनी आक्रमक पवित्रा धारण करून जर आयएएस अधिकारी आमदारांचे फोन घेत नसतील तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय होणार, असा सवाल विचारून पुरी यांच्यावर कारवाईची मागणी केली.

सभापती राम शिंदे- आयएएस प्रवीण पुरी
सभापती राम शिंदे- आयएएस प्रवीण पुरी
मुंबई : विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी नागपूरच्या गुलशननगर येथील दी मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद शाळेबाबत लक्षवेधी उपस्थित केली. या लक्षवेधीच्या माध्यमातून दिव्यांग आयु्क्त प्रविण पुरी यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. मंत्री अतुल सावे यांनी सनदी अधिकारी प्रविण पुरी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी पक्षातील आमदारांनीच आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी थेट निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले.

IAS प्रविण पुरी यांना दणका,  प्रकरण नेमके काय?

दि मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुलामुलींच्या निवासी कर्मशाळेमध्ये कार्यरत असणारे एकूण २६ कर्मचारी असून गेल्या १०-१५ वर्षापासून कार्यरत आहेत. सर्व कर्मचारी शाळेवरच अवलंबून असून संस्थेने काढलेले कर्ज फेडण्याकरीता संस्थाचालकांकडून कर्मचाऱ्यांना मागणी केली जाते. संस्था अध्यक्ष कर्मचाऱ्यांकडून दरमहा प्रत्येकी एक हजारांची मागणी करतात, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. जर शाळा बंद झाली तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. तसेच संस्था चालकांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना स्वतःची बंदूक काढून धमकवल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. ही तक्रार सभागृहाच्या निदर्शनास आणून देत शाळेवर प्रशासक नेमण्याची विनंती भाजप आमदार संदीप जोशी यांनी केली.
advertisement
संस्था चालकांच्या अघोरी धोरणामुळे शिक्षक आणि कर्मचारी आत्महत्या करतील. हे होऊ नये म्हणून दिव्यांग आयुक्त प्रविण पुरी यांनी लक्ष द्यावी, अशी विनंती आम्ही केली. परंतु आमदारांचे सहा सहा फोन ते उचलत नाहीत. ते प्रतिसाद देत नाही. त्यांच्यावर शासन कारवाई करणार का? असा सवाल आमदार जोशी यांनी केला.

IAS अधिकारी आमदारांचे फोन उचलत नसतील तर सर्वसामान्यांच्या प्रश्नाचे काय? दरेकर आक्रमक

advertisement
आमदार जोशी यांच्या तक्रारीला मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिले. मात्र मंत्री सावे यांच्या उत्तरावर भाजप आमदार प्रविण दरेकर यांचे समाधान झाले नाही. त्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारून जर आयएएस अधिकारी आमदारांचे फोन घेत नसतील तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय होणार, असा सवाल विचारून पुरी यांच्यावर कारवाईची मागणी केली.

तातडीने सक्तीच्या रजेवर, निलंबनाची कारवाई

advertisement
अखेर सदस्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन सभापती राम शिंदे यांनी दिव्यांग आयुक्तांना आजच्या आज तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवून सरकारच्या माध्यमातून निलंबित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS प्रविण पुरी यांना दणका, थेट निलंबनाची कारवाई, सभापती राम शिंदेंचे आदेश, प्रकरण नेमके काय?
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement