Fraud Alert: पेमेंट झाल्याचा आवाज येतोय, पण...,स्कॅनच्या नावाने नवा स्कॅम मार्केटमध्ये!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
फोन पे आणि गुगल पे सारख्या दिसणाऱ्या क्लोन ॲपमुळे नागरिक आणि व्यापाऱ्याचे फसवणूक होत आहे. हा ॲप दिसायला फोन पे सारखाच आहे, पेमेंट केल्यावर येणारा आवाज आणि पेमेंट हिस्टरी फोन पे सारखेच आहे.
सोलापूर: फोन पे आणि गुगल पे सारख्या दिसणाऱ्या क्लोन ॲपमुळे नागरिक आणि व्यापाऱ्याचे फसवणूक होत आहे. हा ॲप दिसायला फोन पे सारखाच आहे, पेमेंट केल्यावर येणारा आवाज आणि पेमेंट हिस्टरी फोन पे सारखेच आहे. पण व्यापारी किंवा नागरिकांच्या अकाऊंटमध्ये पैसे जात नाही आणि यातच त्यांची फसवणूक होते. बनावट फोन ॲपद्वारे फसवणूक कशा प्रकारे होते व आपली फसवणूक झालीय हे कसं समजायचं या संदर्भात अधिक माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
डिजिटल पेमेंटच्या जमान्यात डिजिटल फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहे. ऑनलाइन फसवणुकीमध्ये ओटीपी किंवा पासवर्ड विचारून फसवणूक फसवणूक होते हे आपल्याला माहित आहे. पण आता फोन पे सारख्या बनावट ॲपमुळे सुद्धा व्यापाऱ्यांची व ग्राहकांची फसुनुक होत आहे. या फोन पे क्लोन ॲप द्वारे दुकानातील किंवा एखाद्या नागरिकाचा किंवा आर कोड स्कॅन केल्यावर दुकानाचे नाव व नागरिकाचे नाव त्या बनावट फोन पे ॲप मध्ये दिसते. ज्याप्रमाणे फोन पे वर पेमेंट झालेला स्क्रीन दिसतो त्याचप्रमाणे या बनावट फोन पे क्लोन ॲप मध्ये सुद्धा दिसतो, फोन पे सारखाच पेमेंट स्क्रीन शॉट, पेमेंट झाल्यानंतर न येणारा युटीआर नंबर, दुकानाचे व नागरिकाचे नाव त्या बनावट फोन पे क्लोन ॲपवर सुद्धा येत.
advertisement
सध्या सोलापूर शहरासह अनेक ठिकाणी या लोन कोणते ॲप द्वारे फसवणूक करणारे सायबर आरोपी सक्रिय झाले आहे. नागरिकांनी किंवा व्यापाऱ्यांनी एखाद्याकडून जर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट स्वीकारली असेल तर पैसे मिळाल्याची खात्री करूनच व्यवहार पूर्ण करावं. तसेच अनेक दुकानदारांकडे यूपीआय कंपनीने स्पीकर सुद्धा दिलेले आहे, त्या स्पीकरवर पेमेंट आल्याची खात्री करूनच दुकानदारांनी आपलं व्यवहार पूर्ण करावं. बनावट फोन पे द्वारे किंवा ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ पोलीस ठाणे किंवा सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 किंवा 1945 या हेल्पलाइन नंबर वर तक्रार नोंद करावी असे आवाहन सोलापूर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी केले आहे. सोलापूर शहरांमध्ये आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त ऑनलाईन फसवणुकीची तक्रार सोलापूर सायबर पोलीस ठाण्याकडे आले होते. वेळेत तक्रार दिल्यामुळे सायबर पोलिसांनी आता आतापर्यंत फसवणूक झालेल्या नागरिकांचे 1 कोटी 21 लाख रुपये परत मिळून दिले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
November 14, 2025 6:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Fraud Alert: पेमेंट झाल्याचा आवाज येतोय, पण...,स्कॅनच्या नावाने नवा स्कॅम मार्केटमध्ये!

