Jalgaon : तोंडात तंबाखू देऊन 8 दिवसांच्या चिमुरडीची हत्या, जळगावच्या नराधम बापाचं संतापजनक कृत्य
- Published by:Shreyas
 
Last Updated:
आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू देऊन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. आधीच दोन मुली त्यात तिसरी मुलगी झाल्यामुळे बापाने हे संतापजनक कृत्य केलं आहे.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव, 13 सप्टेंबर : आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू देऊन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. आधीच दोन मुली त्यात तिसरी मुलगी झाल्यामुळे बापाने हे संतापजनक कृत्य केलं आहे. मुलीची हत्या केल्यानंतर बापाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर संशयित बापाला पोलिसांनी अटक केली आहे. गोकुळ गोटीराम जाधव (३०) असे या बापाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवार, 2 सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आली. गोकुळने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिला. तिला झोळीत झोपविले, यात तिचा मृत्यू झाला. रात्री फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
घटनेनंतर 10 दिवसापर्यंत चिमुरडीच्या बापाने या घटनेची कुणालाही माहिती मिळू दिली नाही. आशा सेविका जन्माची नोंद घेण्यासाठी घरी गेल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी घटनेची तातडीने गंभीर दखल घेत गोकुळ जाधवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आधीच दोन मुली व त्यात तिसरीही मुलगी झाल्याच्या रागातून त्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिचा जीव घेतल्याची कबुली दिली.
advertisement
घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत संशयित बापाला अटक केली आहे. फॉरेन्सिक पथकाच्या माध्यमातून घटनास्थळी भेट देण्यात आली आहे, तसेच ज्या ठिकाणी बापाने चिमुरडीचा मृतदेहाची विल्हेवाट लावली होती, त्याठिकाणाहून मृतदेह हा ताब्यात घेण्यात आला आहे, पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
September 13, 2023 10:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon : तोंडात तंबाखू देऊन 8 दिवसांच्या चिमुरडीची हत्या, जळगावच्या नराधम बापाचं संतापजनक कृत्य


