Jalgaon Accident : आयशर वाहनांची भीषण धडक, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, भयंकर अपघातात चालकाचा मृत्यू
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.चाळीसगावात दोन आयशर वाहनांची भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा अक्षरश चक्काचूर झाला आहे.
Jalgaon Accident News : जळगाव/चाळीसगाव, विजय वाघमारे : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.चाळीसगावात दोन आयशर वाहनांची भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा अक्षरश चक्काचूर झाला आहे. या अपघातात एका वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
जळगावच्या चाळीसगाव शहरातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोरस फाट्याजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. दोन आयशर वाहनांची एकमेकांना धडक बसल्याची ही घटना आहे. या अपघातात आयशर चालक सागर ताराचंद चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
जळगावच्या चाळीसगाव शहरातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोरस फाट्याजवळ दोन आयशर वाहनांची भीषण धडक होऊन मागील वाहनाचा चालक सागर ताराचंद चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला पुढे जाणाऱ्या आयशरला मागून येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातामुळे मागच्या आयशर वाहनात असलेल्या सागर चव्हाण या जागीच मृत्यू झाला आहे. तर पुढे असलेल्या आयशरलाही त्याच्या पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक बसली आहे. त्यामुळे एकप्रकारे हा विचित्रच अपघात घडला आहे.
advertisement
विशेष म्हणजे या अपघातात एक जिवितहानी झाली आहे. त्याचबरोबर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या या अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान या अपघातानंतर पुढील आयशर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे.या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
August 21, 2025 4:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Accident : आयशर वाहनांची भीषण धडक, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, भयंकर अपघातात चालकाचा मृत्यू