कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, गावातल्या राजकीय वादातून गोळ्या घालून हत्या, तिघे अटकेत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jalgaon Crime: जगदीश ठाकरे हत्या प्रकरणात चाळीसगाव ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली आहे.
विजय वाघमारे, जळगाव: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील बोढरे शिवारात आढळलेल्या मृतदेहाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीची ओळख जगदीश झुलाल ठाकरे (रा. मोरदड, ता. शिंदखेडा, जि. धुळे), अशी झाली असून त्याची गावातील राजकीय वादातून अपहरण करून डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली आहे. आरोपींमध्ये वीरेंद्रसिंग उर्फ विकी तोमर (रा. टाकळी प्रचा), शुभम सावंत व अशोक मराठे (दोघेही रा. मोरदड, जि. धुळे) यांचा समावेश आहे.
गावातील राजकीय वादातून हत्या करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मयताची पत्नी अरुणा ठाकरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाढदिवसाच्या बहाण्याने आपल्या पतीला घराबाहेर नेत हा खून झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
advertisement
अपहरण करून डोक्यात गोळ्या घातल्या, वाढदिवसाला जाण्याचा बहाणा
अपहरण करून डोक्यात गोळ्या घालून मृतदेह कन्नड घाटात फेकला होता. वाढदिवसाला जाण्याच्या बहाण्याने आपल्या पतीला बाहेर नेत खून केल्याचे जगदीश यांच्या पत्नीने फिर्यादीत नमूद केले आहे. गावातील राजकीय वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अवघ्या बारा तासात खुनाचा उलगडा, चाळीसगाव पोलिसांना यश
advertisement
स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप पाटील आणि चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या बारा तासात या खुनाचा उलगडा करण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
घटना नेमकी काय?
कन्नड घाटात अज्ञाताचे प्रेत संशयास्पदरित्या घातपात केलेले मिळून आले होते. त्यावरुन चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली. सदर मयताचे प्रेताची ओळख पटेल असे कोणताही पुरावा आढळून आला नव्हता. त्यामुळे सदर मयताची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. सदर मक्ताची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी त्याचे अंगावरील वस्तू तसेच गोंधलेली निशाणी यांचे तपास यादी बनवून सोशल मीडियावर टाकून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता सदर मयत जगदीश जुलाल ठाकरे (रा. मोरदड ता. जि. धुळे) येथील असल्याचे निष्पन्न झाले.
advertisement
सदर प्रकरणाच्या अनुषंगाने मयताची पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली. राजकीय वैमन्यस्यातून मोरदड गावातील शुभम सावंत, अशोक मराठे आणि एका अनोळखी तरुणाने मिळून त्यांना राहत्या घरुन वाढदिवसाला जाण्याचा बहाणा करुन घेऊन गेले आणि त्यांचा खून करुन कन्नड घाटात फेकून दिले, अशी फिर्याद मयताच्या पत्नीने दिली.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Jul 03, 2025 9:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, गावातल्या राजकीय वादातून गोळ्या घालून हत्या, तिघे अटकेत









