Jalgaon News : जळगावच्या लक्ष्मीचा हिमाचलमध्ये मृत्यू,आयटी कंपनीत काम करणाऱ्या 25 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?

Last Updated:

जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जळगावच्या एका तरूणीचा हिमाचलमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मी रामचंद्र विराणी असे 25 वर्षीय तरूणीचे नाव आहे.

jalgaon news
jalgaon news
Jalgaon News : विजय वाघमारे, जळगाव :जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जळगावच्या एका तरूणीचा हिमाचलमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मी रामचंद्र विराणी असे 25 वर्षीय तरूणीचे नाव आहे. या घटनेने विराणी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने जळगावमध्ये हळहळ व्यक्त होतं आहे.दरम्यान या तरूणीसोबत हिमाचलमध्ये काय घडलं? हे जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मी विराणी ही तरूणी ही जळगाव शहरातील मूळ रहिवाशी होती.आणि ती पुण्यातील एका खासगी आयटी कंपनीत नोकरीला होती.या दरम्यान काही दिवसांपूर्वी कंपनीतील काही मैत्रिणींसह शिमला या ठिकाणी पर्यटनासाठी गेली होती.
शिमलामध्ये पर्यटनाचा आनंद घेत असताना आणि प्रवाशी बसमधून प्रवास करत असताना लक्ष्मी विराणीला मृत्यूनं गाठलं होतं.त्याचं झालं असं की हिमाचल प्रदेशातील शिमला येथे मुसळधार पाऊस पडतो आहे.या पावसामुळे दरड कोसळल्याच्याही घटना घडत आहेत. अशीच दरड लक्ष्मी विराणी प्रवास करत असलेल्या बसवर कोसळली होती.त्यामुळे लक्ष्मी विराणीची मृत्यू झाला होता. लक्ष्मी सोबत आणखी एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
advertisement
दरम्यान लक्ष्मीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच जळगावमधील नातेवाईक तातडीने शिमला येथे रवाना झाले आहेत. तसेच दुर्घटनेची माहिती मिळताच जळगाव जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी स्वतः शिमला जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आणि लक्ष्मीचा मृतदेह जळगावात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली आहे.लक्ष्मीच्या मृतदेहावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेमुळे लक्ष्मी विराणी यांच्या कुटुंबियांसह सहकाऱ्यांवर आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon News : जळगावच्या लक्ष्मीचा हिमाचलमध्ये मृत्यू,आयटी कंपनीत काम करणाऱ्या 25 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement