advertisement

Sharad Pawar : शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार? गिरीष महाजन यांनी केला मोठा दावा

Last Updated:

Sharad Pawar : शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किती आमदार आहेत? यावरुन भाजप नेते गिरीष महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार?
शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार?
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव, 21 ऑगस्ट : अजित पवार यांनी समर्थक आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. यानंतर दोन्ही गटांकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आमच्या बाजूनेच सर्वाधिक आमदार असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात कोणामागे किती आमदार आहेत? याचा अधिकृत आकडा समोर आला नाही. सध्यातरी अजित पवार गटाचे पारडे जड वाटत आहे. दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी यावरुन मोठा दावा केला आहे.
advertisement
संपूर्ण राष्ट्रवादी आमच्यासोबत : महाजन
सुधीर मुनगंटीवार यांच्या वाक्याचा अर्थाचा अनर्थ तुम्ही केला असं वाटत आहे. मात्र, शरद पवार यांच्यासोबत पाच ते सात आमदार आहेत. पूर्ण राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. तीच खरी राष्ट्रवादी असून ती आमच्या सरकार सोबत असल्याचे महाजन म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही, असं वारंवार अजितदादांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्यामागे संपूर्ण राष्ट्रवादी चालली आहे. कुठलाही गटतट नाही. ज्याप्रमाणे एकच शिंदे यांच्यासोबत संपूर्ण शिवसेना आमच्या सोबत आली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीसुद्धा आहे. तिकडे जे आहेत ते राष्ट्रवादीच्या बाहेर आहेत, असा टोलाही महाजन यांनी लगावला.
advertisement
काय म्हणाले गिरीष महाजन?
भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना डिवचलं आहे. "गप्पा करणं सोप्प असतं, संजय राऊत यांनी आतापर्यंत नगरसेवक, महापालिका अशी कुठलीही निवडणूक लढवली नाही. त्यांनी एकदा निवडणूक लढवावी", असं आव्हान मंत्री गिरीष महाजन यांनी दिलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार भाजप आणि त्यांच्या मंत्र्यावर सडकून टीका करत आहेत. याला प्रत्त्युत्तर देत गिरीष महाजन यांनी राऊतांना आव्हान दिलं आहे. संजय राऊत यांनी आतापर्यंत नगरसेवक पदाची असेल महापालिकेची असेल अशी कुठलीही निवडणूक लढवली नाही. ते फक्त मोठ्या मोठ्या गप्पा करत आहेत. गप्पा करणं सोपं असतं. त्यांनी एकदा निवडणुकीत उभं राहावं आणि आपल्याला किती मतं पडतात हे तपासून घ्यावं असं माझं त्यांना थेट आव्हान असल्याचं महाजन म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Sharad Pawar : शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार? गिरीष महाजन यांनी केला मोठा दावा
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement