Jalgaon News : दोघांचा खून करुन फरार आरोपींना जळगावमध्ये अटक! तपासात MIM नेत्याचं घेतलं नाव
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jalgaon News : एमआयएमच्या नेत्याच्या सांगण्यावरून 16 लाखांची सुपारी घेत खून केल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली.
जळगाव, (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) : गुजरातमधील दोन सराईत गुन्हेगारांना जळगाव ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केलंय. सुपारी घेऊन सुरतमध्ये दोघांचा खून करुन फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. एमआयएमच्या नेत्याच्या सांगण्यावरून 16 लाखात सुपारी घेऊन दोघांचा खुन केल्याची कबुली दोघांनी चौकशीत दिली. यातील एका आरोपीवर पाच खुनाचे गुन्हे तर दुसऱ्या ओरीपीवर 15 खुनाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
अफजल अब्दुल शेख आणि त्याचा साथीदार प्रज्ञ्नेश दिलीप गामीत अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. हे खुन केल्यापासून गुजरात राज्यातून फरार झाले होते. दोन्ही आज जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे आले असून ट्रकमध्ये बसून कुठेतरी जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. सुरतचे MIM चे खुर्शीद अली सैय्यद यांनी 16 लाख रुपयाची सुपारी दिल्यावरून बिलाल चांदी, अज्जु या दोघांचा गळा कापून खून केल्याची कबुली दोघा आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
advertisement
वाचा - रस्त्यावर होता व्यक्ती; पोलीस दिसताच म्हटला 'मी देवीचा भक्त', शर्ट काढताच खळबळ
सदर दोन्ही आरोपी हे सुरत येथील कुविख्यात गुन्हेगार असून त्यांच्या शोधाकरीता गुजरात पोलीसांनी 11 पथके तयार केली होती. सदर दोन्ही आरोपींना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखा, जळगावकडील पथकास यश आले आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
June 29, 2024 8:05 PM IST
मराठी बातम्या/जळगाव/
Jalgaon News : दोघांचा खून करुन फरार आरोपींना जळगावमध्ये अटक! तपासात MIM नेत्याचं घेतलं नाव


