Jalgaon Crime : अल्पवयीन मुलावर 8 महिने अनैसर्गिक अत्याचार; आरोपीने फोटोही केले व्हायरल, जळगाव हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
जळगाव, नितीन नांदूरकर, प्रतिनिधी : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीनं मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आलं आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सायत असित पांडा (वय २०, पश्चिम बंगाल) असं या याप्रकरणातील आरोपीचं नाव असून, त्याच्याविरोधात पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून विविध कलामातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शनिपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका भागात गेल्या 8 महिन्यांपासून वेळोवेळी एका अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार २८ जून रोजी उघडकीस आला आहे. सायत असित पांडा (वय २०, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे.
आरोपीने पीडित मुलाचे काही फोटो मोबाइलमध्ये घेतले होते. त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत, आरोपीनं या अल्पवयीन मुलावर गेल्या ८ महिन्यांपासून वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केला.
advertisement
त्यानंतर पीडित मुलाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर वेगवेगळे अकाऊंट तयार करून व्हायरल केले. २८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुरुवारी पीडित मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून सायत पांडावर शनिपेठ पोलिस ठाण्यात भादंवि अंतर्गत कलम ५०६, ३७७, ५०० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे करीत आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
July 06, 2024 1:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon Crime : अल्पवयीन मुलावर 8 महिने अनैसर्गिक अत्याचार; आरोपीने फोटोही केले व्हायरल, जळगाव हादरलं


