Jalgaon : निमंत्रण मिळालं तरी PM मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही, खडसेंनी स्पष्टच सांगितलं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही, त्यातच आता मोदींच्या कार्यक्रमात उपस्थितीवरून नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे.
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर येणार असून लखपती दीदी प्रशिक्षण सत्र आणि मेळाव्यात ते संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील ३० व देशातील ५० लखपती दिदींचे अनुभव,अडचणी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकून घेणार आहेत. दरम्यान, या मेळाव्याला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे उपस्थित राहणार की नाही याची चर्चा रंगलीय. एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी आपण भाजपमध्ये प्रवेश कऱणार असल्याचं सांगितलं होतं. पण अद्याप त्यांचा भाजपप्रवेश झालेला नाही. त्यातच त्यांना मोदींच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही देण्यात आलेलं नाही. शासकीय कार्यक्रम असतानाही आमदार असणाऱ्या खडसेंना निमंत्रण नसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार की नाही याबाबत विचारले असता एकनाथ खडसे यांनी म्हटलं की, शासकीय कार्यक्रम असल्यानं सर्व आमदारांना निमंत्रण देणं बंधनकारक होतं, पण मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं नाही. वेळेत निमंत्रण मिळालं असतं तर मी कार्यक्रमाला गेलो असतो. आता निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही असं खडसे यांनी स्पष्ट केलं.
advertisement
लखपती दिदी प्रशिक्षण सत्रात पंतप्रधान ६० मिनिटे भाषण करणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामविकास मंत्री कमलेश पासवान,मुख्यमंञी एकनाथ शिदे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,अजित पवार आदी सह राज्यातील मंञी उपस्थित राहातील. सकाळी सव्वा अकरा ते १२ या वेळेत पंतप्रधान मोदी बचत गटाच्या महिलांसोबत संवाद साधणार आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2024 8:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon : निमंत्रण मिळालं तरी PM मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही, खडसेंनी स्पष्टच सांगितलं


