advertisement

जरांगेंना सरकारने अध्यादेश दिला, पण…, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला संशय

Last Updated:

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

News18
News18
जळगाव, प्रतिनिधी :  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. मुंबईच्या वेशीवर अर्थात वाशीमध्ये मराठा बांधवांचं वादळ धडकल्यानंतर सरकारनं जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वत्र विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे? 
सरकारने कितीही सांगितलं की मराठा सामाजाच्या मागण्या मान्य झाल्या तरी या सरकारकडून एकाएकी आरक्षणाच्या मागण्या मान्य होणे अवघड आहे. हे सरकार वारंवार आरक्षणाबाबत फक्त आश्वासन देत आहे. ओबीसीतून आरक्षण देऊ असं सरकार म्हणत आहे. तर दुसरीकडे  देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसीला धक्का न लागता आरक्षण द्यायचं आहे. सरकारने जर फक्त समाधानासाठी आरक्षणाचा जीआर काढला असेल तर तो न्यायालयात टिकणार नाही असं खडसे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू होती. तब्बल तीन तासांच्या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी जीआर आपले वकील आणि मराठा बांधवांना वाचून दाखवला. त्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जरांगेंना सरकारने अध्यादेश दिला, पण…, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला संशय
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement