जळगावमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसला आग, मोठी दुर्घटना टळली

Last Updated:

यावल शहरातील बसस्थानकाजवळ एसटी बसनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे, चालकाच्या प्रसगांवधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

News18
News18
जळगाव, इम्तियाज अहमद, प्रतिनिधी : जळगावच्या यावलमध्ये मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. बसस्थानकात पोहोचण्यापूर्वीच प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी बसच्या खाली सुखरूप उतरल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहारातील बसस्थानकाजवळ असलेल्या पंचायत समितीसमोर एसटी बसनं अचानक पेट घेतला. ही बस विदगाव मार्गे यावला आली होती. आग लागल्याचं लक्षात येताच चालकानं प्रसंगावधान राखत बस थांबवली. बस थांबताच सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.
यावल एसटी आगाराची बस प्रवासी घेवून जळगाव येथून विदगाव मार्गे यावलकडे येत होती. ही गाडी यावल शहरातील पंचायत समितीच्या प्रवेशद्वारासमोर मुख्य मार्गावर होती. यावेळी अचानक बसमधून धूर निघायला सुरूवात झाली. काही वेळात एसटी बसला आग लागल्याचे लक्षात आले. हा प्रकार लक्षात येताच प्रवाशांच्या पोटात भितीने गोळा उठला, एसटीत एक गोंधळ उडाला. चालकाने प्रसंगावधान दाखवून तातडीने बस थांबवली. सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. ही घटना इतर ठिकाणी घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. याबाबत यावलचे आगार प्रमुख दिलीप महाजन यांना विचारले असता, वाहनाचे इंजिन गरम झाल्याने हा प्रकार झाला असावा असं त्यांंनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जळगावमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसला आग, मोठी दुर्घटना टळली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement