Uddhav Thackeray : 'आपल्या वडिलांचं कर्तृत्व..' घराणेशाहीवरुन उद्धव ठाकरेंचा थेट अमित शहांवर निशाणा

Last Updated:

Uddhav Thackeray : जळगाव येथे बोलताना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते अमित शहांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

घराणेशाहीवरुन उद्धव ठाकरेंचा थेट अमित शहांवर निशाणा
घराणेशाहीवरुन उद्धव ठाकरेंचा थेट अमित शहांवर निशाणा
जळगाव (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : घराणेशाहीच्या आरोपांवरुन उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपच्या शीर्ष नेत्यांना लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वडिलांचे कर्तृत्व सांगावं? असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे आज बुलढाणा लोकसभा मतदार संघात आले होते. त्यावेळी त्यांनी जाहीर सभेतून भाजपवर टीका केली आहे.
मोदींना पहिल्यांदा शिवसेनेचा पाठिंबा
भाजपने ज्यावेळी मोदींच नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर केलं. त्यावेळी सर्वात अगोदर शिवसेनेने पाठिंबा दिला होता. भाजपच्या डोक्यावर सर्वच बसत आहे. मिंदे गट, अजित पवार आणि आता अशोक चव्हाण बसले. भ्रष्टाचार करणारे सर्वच भाजपमध्ये बसत आहेत. भाजपची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. सर्व सामान्य जनतेला मोदींपेक्षा उद्धव ठाकरे जवळचे वाटत आहेत. आजही मी शिवसेनेचा पक्ष प्रमुखच असल्याचे ठाकरेंनी सांगितले.
advertisement
घराणेशाहीवरुन शाहांना घेरलं
शेतकऱ्यांची घरेची घरे संपविणारे घराणेशाही संपविणार असल्याची भाषा करत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही जनता ठरवेल. मात्र, अमित शहाजी तुम्ही मुलाला क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष केलं. ती घराणेशाही नाही का? वर्ल्ड कपचा अंतिम सामना पण तिकडे घेऊन गेले होते. मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांनी आपल्या वडिलांचे कर्तृत्व सांगावे. 10 वर्षे आम्ही मोदींना तिथं पंतप्रधान पदी बसवलं. आम्ही मोदींच्या नावाने मत मागितली होती. त्यावेळी आमची युती होती. पण तुम्हीही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मत मागितली, आताही मत मागत आहात. अजित पवार यांनी सिंचन घोटाळा केला, अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा केला. हा जनादेशचा अपमान नाही का?
advertisement
मोदींना मी सांगतोय सोयाबीन, कापूसला भाव नाहीत. भाजपच्या या वृत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. 40 लाख कोटींच कर्ज तुम्ही उद्योजकांचे माफ करता. मग शेतकऱ्यांनी काय घोड मारलं? भाजप किती लुटत आहे. जनता काही आंधळी नाही. केंद्र सरकारला गुडघ्यावर बसविण्याची ताकद आपल्यात आहेत. तुम्ही गद्दारी का केली? मी असं काय केलं होतं? गुजरात समृद्ध होत असेल तर जरूर करा. मात्र, महाराष्ट्राचे प्रकल्प नेऊ नका. मत द्यायचे आम्ही आणि महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला नेणार.
advertisement
उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो. त्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत. शेतकरी गरीब आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आता ही लढाई माझी एकट्याची नाही आपल्याला सोबत लढायची आहे. दिलेल्या वचनाला जगला असता तर ही वेळ आली नसती. भाजपची दशा झाली आहे. दिलेलं वचन पाळलं असतं तर इतके तुकडे झाले नसते. काय मिळालं तुकडे करून? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Uddhav Thackeray : 'आपल्या वडिलांचं कर्तृत्व..' घराणेशाहीवरुन उद्धव ठाकरेंचा थेट अमित शहांवर निशाणा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement