Maharashtra Elections 2024 : भाजपचा आणखी एक बडा नेता जरांगेंच्या भेटीला, मध्यरात्रीच्या चर्चेत काय झालं?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections Manoj Jarange Patil : सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या आणखी एका नेत्याने मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.
जालना : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही शड्डू ठोकत सरकारला आव्हान दिले आहे. मनोज जरांगे पाटील हे विधानसभेला मराठा समाजातील उमेदवार निवडणुकीत उतरवणार की कोणाला पाठिंबा देणार याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या आणखी एका नेत्याने मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा मतदारांनी समाजाचे हित लक्षात घेऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर जरांगे पाटील हे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार याची चर्चा सुरू झाली. या सगळ्या घडामोडीत विविध पक्षांचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्री भाजपच्या नेत्याने जरांगे पाटील यांची भेट घेतली.
advertisement
मध्यरात्रीनंतर धस यांनी जरांगेंसोबत केली चर्चा
भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सुरेश धस हे आष्टी पाटोदा मतदारसंघाचे असून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. धस हे मध्यरात्रीनंतर अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यानंतर सरपंच यांच्या घरी मुक्कामी असलेल्या जरांगे यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली. बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे मतदान आहे. बीड लोकसभा निवडणुकीतही हे दिसून आले. त्यानंतर आता, सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुरेश धस यांच्यासोबतच्या बैठकीतला तपशील समोर येऊ शकला नाही. एक दिवस आधी महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनीदेखील मध्यरात्रीनंतर मनोज जरांगे पाटील भेट घेतली.
advertisement
राधाकृष्ण पाटील यांनी घेतली भेट…
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची मध्यरात्रीनंतर भेट घेतली. आचारसंहिता लागताच मराठवाड्यात हालचालिंना वेग आला आहे. त्यामुळे विखे हे मध्यरात्री अंतरवाली सराटीत दाखल झाले. जरांगे यांच्यासोबत विखेंनी चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री सुरेश धस यांनी देखील भेट घेतली.
advertisement
इतर महत्त्वाची बातमी :
view comments
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Oct 18, 2024 7:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Maharashtra Elections 2024 : भाजपचा आणखी एक बडा नेता जरांगेंच्या भेटीला, मध्यरात्रीच्या चर्चेत काय झालं?









