जळगावात भीषण अपघात, मालवाहू गाडीची बाइकला धडक, चौघांचा जागीच मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जामनेर-पहूर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईत भीषण अपघातात केटीएम दुचाकीवरील अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे, अजय व एक अनोळखी तरुण जागीच ठार झाले.
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव: जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली. जामनेर-पहूर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघात झाला. दुचाकी आणि मालवाहू वाहनाच्या धडकेत जामनेर येथील चार तरुण जागीच ठार झाले आहेत. या करुण घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, लोकांच्या मनात मोठी भीती पसरली आहे.
दुचाकी आणि मालवाहू वाहनाची धडक
पहूरजवळील काही अंतरावर ही दुर्घटना घडली. एका केटीएम दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरील चौघांना सावरण्याची किंवा बचावण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या अपघातात अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे आणि अजय, तर एकाची ओळख पटली नाही. या चार तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला.
advertisement
घटनेनंतर मदतकार्यासाठी धावले नागरिक
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पहूर येथील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी अत्यंत तत्परतेने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना त्वरित उपचारांसाठी हलवले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली.
शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल
view commentsअपघातात मृत्यू झालेल्या तरुणांना पुढील प्रक्रिया आणि शवविच्छेदनासाठी जामनेर सरकारी रुग्णालय, पहूर सरकारी रुग्णालय आणि जळगाव सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एक प्रकारची स्तब्धता पसरली आहे. पोलीस या भीषण अपघाताच्या पुढील कारणांचा आणि मालवाहू चालकाचा शोध घेत असून, अधिक तपास करत आहेत.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
November 26, 2025 8:00 AM IST


