कल्याण-डोंबिवली, अंबरनाथमध्ये बत्ती गुल, तासाभरापासून अंधार, महावितरणकडून महत्त्वाची अपडेट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार भिवंडी-पडघा येथील 220 केवी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे घडला आहे.
कल्याण : कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या उपनगरांमध्ये अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तासभरापासून संपूर्ण परिसर बत्तीगुल झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, हा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार भिवंडी-पडघा येथील 220 केवी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे घडला आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सबस्टेशनमधील काही महत्त्वाच्या मशीनमध्ये जाळ होण्याची घटना घडली असून, त्यामुळे विजेचा पुरवठा पुढे वितरित करता येत नाही.
सध्या तांत्रिक कर्मचारी आणि अभियंते घटनास्थळी काम करत आहेत. मात्र, वीज नेमकी केव्हा येणार याबाबत अद्याप निश्चित वेळ सांगता आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अजून काही काळ अंधाराचा सामना करावा लागणार आहे.
advertisement
या अचानक झालेल्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे घरगुती कामे, व्यवसायिक उपक्रमांचे कामकाज ठप्प झाले आहे. नागरिकांनी महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
July 10, 2025 8:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कल्याण-डोंबिवली, अंबरनाथमध्ये बत्ती गुल, तासाभरापासून अंधार, महावितरणकडून महत्त्वाची अपडेट


