Devendra Fadnavis : 'वॉर रूम'चा मास्टर प्लॅनर पुन्हा अॅक्शनमध्ये! फडणवीसांचा विश्वासू अधिकारी नव्या जबाबदारीसह मैदानात
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Tushar Rupnavar
Last Updated:
धवसे हे 2014 पासून मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) आणि सहसचिव म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा, डिजिटल प्रकल्प, गुंतवणूक धोरण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मुंबई: महाराष्ट्र शासनाने गुंतवणूक व धोरणात्मक निर्णयांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौस्तुभ धवसे यांची "मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार – गुंतवणूक व धोरण (Chief Advisor – Investments and Strategy)" या नव्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
धवसे हे 2014 पासून मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) आणि सहसचिव म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा, डिजिटल प्रकल्प, गुंतवणूक धोरण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रशासनात पारंपरिक सेवेबाहेरून आलेल्या प्रभावी व्यावसायिकांमध्ये त्यांचा उल्लेख नेहमीच विशेष केला जातो.
‘वॉर रूम’ची कल्पना
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात कौस्तुभ धवसे यांनीच मुख्यमंत्री वॉर रूम या संकल्पनेची मांडणी केली होती. याच वॉर रूमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे निर्णय, विशेषतः 1.8 लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांना वेग देण्यात आला. त्याच यंत्रणेचा समन्वय आणि पुढील वाटचाल याची जबाबदारी आता अधिकृतपणे धवसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
advertisement
शैक्षणिक आणि आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी
मुंबईच्या अंधेरीत वाढलेले कौस्तुभ धवसे हे डी.जे. संगवी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी एस.पी. जैन संस्थेतून व्यवस्थापन पदविका (PGDM) आणि पुढे हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथून Public Policy मध्ये पदवी प्राप्त केली आहे. ही शैक्षणिक तयारी त्यांच्या धोरणात्मक निर्णयक्षमता आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनात नेहमीच दिसून आली आहे.
advertisement
राज्यातील धोरणात्मक दिशा निर्धारणात महत्त्वाची भूमिका
धवसे यांच्या नव्या भूमिकेतून त्यांनी पुढील क्षेत्रांमध्ये सरकारला दिशा देण्याची अपेक्षा आहे:
महाराष्ट्राला भारतातील अग्रगण्य थेट विदेशी गुंतवणूक (FDI) केंद्र म्हणून अधिक बळकट करणे
फिनटेक, डेटा सेंटर्स, सेमिकंडक्टर्स, लॉजिस्टिक्स, आणि AI क्षेत्रात धोरणात्मक गुंतवणुकीला चालना देणे
advertisement
जागतिक भागीदारी व नवतंत्रज्ञान धोरणांच्या अंमलबजावणीस मदत करणे
राज्य शासनाच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णय प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ही नियुक्ती केली गेल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. धोरणात्मक प्रगतीच्या दिशेने ही पावले निर्णायक ठरणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 12:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : 'वॉर रूम'चा मास्टर प्लॅनर पुन्हा अॅक्शनमध्ये! फडणवीसांचा विश्वासू अधिकारी नव्या जबाबदारीसह मैदानात