महाराष्ट्रातील 65 विद्यार्थ्यांना इस्त्रो भेटीची मोठी संधी, कोल्हापूरच्या 19 मुलांचा समावेश, कशी असते प्रक्रिया?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्यातील 19 विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील तसेच वाड्या वस्त्यांवरील सामान्य कुटुंबातील आहेत.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : सध्या बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा देत असतात. अशाच प्रकारे एका परीक्षेच्या माध्यमातून निवड होऊन उत्तुंगतेज फाउंडेशन ही संस्था इस्रो सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटीसाठी मोफत घेऊन जाते. यंदा यासाठी महाराष्ट्रातील तब्बल 65 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा सलग दुसऱ्या वर्षी अव्वल ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 19 विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील तसेच वाड्या वस्त्यांवरील सामान्य कुटुंबातील आहेत.
advertisement
हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील उत्तुंगतेज फांउडेशन ही संस्था मागील 5 वर्षापासुन ग्रामीण व शहरी भागात सामाजिक तसेच विज्ञान क्षेत्रात कार्य करीत आहे. या संस्थेमार्फत राज्यभरात बाल वैज्ञानिक स्पर्धा परिक्षा दरवर्षी घेतली जाते. याच परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो, आयआयटी, आयआयएम आणि सायन्स सेंटर, अहमदाबाद या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत अभ्यास दौऱ्यासाठी नेले जाते.
advertisement
मागील 2 वर्षात या परीक्षेत यश मिळवणारे सर्वात जास्त विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. यंदाही कोल्हापूर जिल्ह्यातून 19 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. याबाबतची माहिती उत्तुंगतेज फाऊंडेशनचे संस्थापक रामेश्वर हालगे आणि कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी एस. टी.पाटील यांनी दिली आहे.
जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!
advertisement
वैज्ञानिक घडवण्यासाठी चळवळ -
उत्तुंगतेज फाऊंडेशन मार्फत सुरू करण्यात आलेल्या 'मला शास्त्रज्ञ व्हायचंय', या चळवळीच्या माध्यमातूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील भविष्यामध्ये शास्त्रज्ञ होण्याची स्वप्ने बघावीत, या उद्देशानेच ही चळवळ सर्वत्र महाराष्ट्रभर राबवली जाते. या चळवळीच्या माध्यमातूनच उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते, असे संस्थेचे संस्थापक रामेश्वर हालगे यांनी सांगितले.
advertisement
दरवर्षी मिळते विद्यार्थ्यांना संधी -
उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेनंतर निवडक विद्यार्थ्यांना देशभरातील विविध उच्च संस्थांना भेट देण्याची संधी मिळत असते. दरवर्षी महाराष्ट्रातील 60 विद्यार्थ्यांना विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी मोफत नेले जाते. एकूण 100 गुणांची ही परीक्षा घेतली जाते. तर आतापर्यंत एकूण 300 विद्यार्थ्यांनी हा विज्ञान अभ्यास दौरा केला आहे. यामुळे विद्यार्थी शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्न बघायला सुरुवात करतात. ही एक महाराष्ट्रातील विज्ञान क्षेत्रातील अभिनव परीक्षा आहे, असेही मत यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
कोल्हापुरातील 19 विद्यार्थ्यांची निवड -
advertisement
दरवर्षीप्रमाणे यावर्षी संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या स्पर्धा परीक्षेला 2 हजार 300 विद्यार्थी बसले होते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून त्यातून 60 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. लेखी व मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांची ही गुणवत्तापूर्वक निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा लहान गटातून गडहिंग्लज तालुक्यातील शिवाजी विद्यालय शाळेच्या अमोघ सदाफुले याने, तर मोठ्या गटात राधानगरी तालुक्यातील सरवडे गावच्या किसनराव मोरे हायस्कूलच्या मयुरी विजय रानमाळे या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. यासोबतच कोल्हापुरातील एकूण 19 विद्यार्थी इस्त्रोसह इतर ठिकाणांच्या अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहेत.
दरम्यान, निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात आले आहे. तर दरवर्षी अशी संधी विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे पुन्हा नव्याने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन देखील हालगे यांनी केले आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
June 25, 2024 7:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
महाराष्ट्रातील 65 विद्यार्थ्यांना इस्त्रो भेटीची मोठी संधी, कोल्हापूरच्या 19 मुलांचा समावेश, कशी असते प्रक्रिया?