कोल्हापुरात पुन्हा झाले मगरीचे दर्शन, नागरिक भीतीच्या छायेखाली

Last Updated:

कोल्हापुरातील पेठवडगाव परिसरात एसटी स्टँड समोर खोदलेल्या खड्ड्यात पुन्हा एकदा मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोल्हापुरातील पेठ वडगाव परिसरात एसटी स्टँड समोर खोदलेल्या खड्ड्यात पुन्हा एकदा म
कोल्हापुरातील पेठ वडगाव परिसरात एसटी स्टँड समोर खोदलेल्या खड्ड्यात पुन्हा एकदा म
कोल्हापूर : कोल्हापुरातील पेठवडगाव परिसरात एसटी स्टँड समोर खोदलेल्या खड्ड्यात पुन्हा एकदा मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मगरीचे पिल्लू दिसताच समोर असणाऱ्या काही व्यक्तींनी याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. वारंवार ही घटना घडत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होतोय.
कोल्हापुरातील पेठवडगाव एसटी स्टँड परिसरामध्ये मोकळी जागा आहे. या जागेमध्ये इमारतीच्या बांधणीसाठी मोठमोठे खड्डे खोदलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले असते. या खड्ड्यांपैकी एका ठिकाणी हे मगरीचे पिल्लू नागरिकांना आढळले. हे समजताच पाहणाऱ्यांची संख्या वाढली.
advertisement
ही घटना नगरपालिका प्रशासनास कळविण्यात आली. सुमारे दीड महिन्यांपूर्वीही या ठिकाणी आणखी एका छोट्या पिल्लाचे दर्शन झाले होते. यामुळे या खड्ड्यात अजून मगरी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या ठिकाणी कोणताही प्रवाह नसताना, जवळ ओढा नसताना या खड्ड्यात मगरींचा वावर कसा? असा प्रश्न नागरिकांना पडला असून मगरी आल्या की कोणी आणून सोडल्या याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. पेठवडगावच्या मध्यवर्ती ठिकाणी मगर आल्याचे वृत्त फोटोसह समाजमाध्यमावर दिवसभर फिरत होते.
advertisement
पेठवडगाव फेब्रुवारी महिन्यात पाण्याने भरलेल्या खड्ड्याच्या काठावर मगरीचे पिल्लू आढळून आले होते. याविषयी पालिका प्रशासन व वनविभागाला कळविण्यात आले होते. पण कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या या खड्ड्यात असणाऱ्या मगरी पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे, असे डॉ. अशोक चौगुले, पेठवडगावचे माजी उपनगराध्यक्षांनी सांगितले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापुरात पुन्हा झाले मगरीचे दर्शन, नागरिक भीतीच्या छायेखाली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement