एका लग्नाची क्रांतिकारी गोष्ट! लग्नाच्या याद्यांवर प्रथमच महिलांच्या सह्या, निर्णयाचे होतंय कौतुक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
एरवी एखाद्या घरात लग्न ठरवताना सुरुवातीला याद्या लिहिण्याची परंपरा आहे. अर्थात इथं सगळी सूत्र असतात ती पुरुषांच्याच हातात. मात्र चिपरी गावांमध्ये पाटील आणि चौगुले कुटुंबीयांनी एक वेगळा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आणि समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आपण समाजातील चालीरीती, रूढी-परंपरा झुगारून महिलांना सन्मान देण्यासाठी नव्या प्रथेचा पायंडा पडलेल्या अनेक उदाहरणे आपण ऐकले आहेत. मात्र पुरोगामीत्वाचा प्रचार करणाऱ्या कोल्हापुरात महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक पुढे पाऊल कोल्हापूरकरांनी टाकल्याचे चित्र पाहायला मिळालं.
advertisement
एरवी एखाद्या घरात लग्न ठरवताना सुरुवातीला याद्या लिहिण्याची परंपरा आहे. अर्थात इथं सगळी सूत्र असतात ती पुरुषांच्याच हातात. मात्र या परंपरेला फाटा देत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या चिपरी गावांमध्ये पाटील आणि चौगुले कुटुंबीयांनी एक वेगळा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आणि समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला.
advertisement
निखिल पाटील आणि प्रीतल चौगुले यांच्या लग्नाच्या याद्या चक्क महिलांनी पुढाकार घेत महिलांच्या सहीनेच झाल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाटील आणि चौगुले कुटुंबीयांनी महिलांचा सन्मान राखत या निमित्ताने एक सामाजिकतेचा संदेश दिला आहे. या क्रांतिकारी विचारांची संकल्पना कुमार पाटील यांच्या सून शर्वरी पाटील यांची होती. या यादीवर कस्तुरी पाटील, उमा खोत, सुनीता पाटील, सोनाली आवटी, अनिता पाटील, शोभा चौगुले, सारिका तारे, पायल मोकाशी, सुजाता कल्याणी, प्रभावती चौगुले यांच्या स्वाक्षरी आहेत.
advertisement
मुलगा निखिल असे पदव्युत्तर शिक्षण झाला असून पर्यावरण विभागात तो दिल्लीमध्ये नोकरीला आहे तर मुलगी प्रीतल ही प्राध्यापक आहे. शर्वरी पाटील यांच्या क्रांतिकारी संकल्पनेतून निखिल पाटील आणि प्रीतल चौगुले यांच्या लग्नाची गाठ ही महिलांनीच बांधली. लग्नाच्या यादव वर स्वाक्षऱ्या देखील महिलांनीच केल्या. या दोन्ही कुटुंबाने सामाजिक विचारांचा वारसा जपल्याने सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतंय.
advertisement
मुळात लग्न ठरवताना सर्वच निर्णय पुरुष मंडळी घेत असतात. लग्नाची बोलणी आणि निर्णय देखील तेच घेतात. मात्र पाटील आणि चौगुले कुटुंबातील महिलांनी हुंड्याला फाटा देऊन हे लग्न ठरवलं. त्यासोबतच शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रताप बंदीचा निर्णय घेऊन ऐतिहासिक पाऊल यापूर्वी टाकले होते. त्यानंतर आत्ताच्या या लग्नाच्या याद्या लिहून महिलांनी आणखी एक नवे पाऊल टाकले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळतंय.
advertisement
view comments
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
March 08, 2025 8:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
एका लग्नाची क्रांतिकारी गोष्ट! लग्नाच्या याद्यांवर प्रथमच महिलांच्या सह्या, निर्णयाचे होतंय कौतुक

