कोल्हापूरकर पाणी जपून वापरा, 2 दिवस संपूर्ण शहराचा पुरवठा बंद राहणार, कारण काय?

Last Updated:

Kolhapur Water Cut: कोल्हापूरकरांना 2 दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कोल्हापूरकर पाणी जपून वापरा, 2 दिवस संपूर्ण शहराचा पुरवठा बंद राहणार, कारण काय?
कोल्हापूरकर पाणी जपून वापरा, 2 दिवस संपूर्ण शहराचा पुरवठा बंद राहणार, कारण काय?
कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महापालिकेतर्फे काळम्मावाडी योजनेची देखभाल दुरूस्ती व अमृत योजनेवरील मुख्य लाईनवरील क्रॉस कनेक्शनची कामे 10 व 11 मार्च रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी संपूर्ण कोल्हापूर शहर आणि उपनगरांचा तसेच ग्रामीण भागातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवारी देखील पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सी आणि डी वॉर्डमधील नागरीकांचा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.
कोणत्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद?
यामध्ये ए, बी, वॉर्ड अंतर्गत फुलेवाडी रिंगरोड, गजानन कॉलनी, जयभवानी कॉलनी, अयोध्या कॉलनी, गजानन कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, संतसेना, अभीयंता कॉलनी मातंग वसाहत, बोंद्रेनगर, शिवशक्ती नगर, मथूरानगरी, धनगरवाडा, इंगवले कॉलनी, गडकरी कॉलनी, कोतवाल नगर, नृसिंह कॉलनी, सतयाई कॉलनी, राज्याभिषेक कॉलनी, डायना कॅसल, अष्टविनायक कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, धनगरवाडा, माऊली नगर, दत्तकॉलनी व पुर्ण रिंगरोड, नाना पाटीलनगर, बीडी कॉलनी, राजोपाध्ये नगर, राजेसंभाजीनगर, गंधर्व नगरी, तुळजाभवानी कॉलनी, महादेव नगरी, पांडुरंगनगरी, सर्वे कॉलनी, गणेश कॉलनी या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
तसेच टाकळकर कॉलनी, संपुर्ण राधानगरी रोड परिसर, हरिओम नगर, मोहिते मळा, इंद्रपस्थनगर परिसर, देवणे कॉलनी, सुश्रृषा नगरी, महालक्ष्मी पार्क, केदार पार्क, शिवराम पोवार कॉलनी, क्रशर चौक झोपडपट्टी, गजलक्ष्मी पार्क, व राधानगरी रोड परिसर सलग्नीत ग्रामिण भाग व ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण राजारामपुरी परिसर, शाहुमिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन परिसर, रेव्हेन्यु कॉलनी, अरूणोदय परिसर, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कुल परिसर, सम्राट नगर, प्रतिकानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ परिसर, नवश्या मारूती चौक, दत्तगल्ली, यादवनगर या भागात देखील पाणी येणार नाहीत.
advertisement
कामगार चाळ, पंत मंदीर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स परिसर, राजाराम रायफल, काटकरमाळ, कावळानाका, संपूर्ण कसबा बावडा, लाईन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत, रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळापार्क, रमणमळा, शाहुपूरी व्यापार पेठ, व्हीनस कॉर्नर, शाहुपूरी 1 ते 4 गल्ली, बी.टी.कॉलेज परिसर, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला परिसर या भागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही.
advertisement
या भागातील नागरिकांनी सोमवार व मंगळवारी (10 व 11 मार्च 2025 रोजी) उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरकर पाणी जपून वापरा, 2 दिवस संपूर्ण शहराचा पुरवठा बंद राहणार, कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement