Latur Waqf Board : वक्फचा शेकडो एकर जमिनीवर दावा प्रकरणात मोठा ट्वीस्ट, समोर आली मोठी अपडेट...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Latur Waqf Board : वक्फ बोर्डाकडून लातूर जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
मुंबई : वक्फ बोर्डाकडून लातूर जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. लातूरमधील अहमदपूर येथील शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आल्याचे पडसाद राज्यासह देशभरात उमटले. आता या प्रकरणावर एक ट्वीस्ट समोर आला आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, वक्फ बोर्डाकडून त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी काय म्हटले?
महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी म्हटले की, वक्फ बोर्डाने तळेगावमधील शेतकऱ्यांना नोटीस पाठवून जमिनीवर दावा केला असल्याचे वृत्त समोर आले. हे वृत्त समोर आल्यानंतर आपण वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची अधिक माहिती घेण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी अधिक माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की, बाबू नावाच्या एका व्यक्तीने लवादाकडे जमिनीच्या दाव्याबाबत तक्रार दाखल केली आहे. लवादाकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विचारणा करण्यात आली आहे. वक्फ बोर्डाकडून लातूरच नव्हे तर राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीवर दावा करणारी नोटीस पाठवली नसल्याचे स्पष्टीकरण समीर काझी यांनी दिले.
advertisement
वक्फ म्हणजे काय?
वक्फ म्हणजे इस्लामिक कायद्यांतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी समर्पित मालमत्ता. वक्फ हा अरबी शब्द वकुफापासून आला आहे, ज्याचा अर्थ कायमस्वरूपी निवासस्थान आहे. वक्फ म्हणजे ट्रस्टची मालमत्ता सार्वजनिक कल्याणासाठी समर्पित करणे. इस्लाममध्ये ही एक प्रकारची सेवाभावी व्यवस्था आहे. वक्फ म्हणजे इस्लामच्या अनुयायांनी दान केलेली मालमत्ता. हे जंगम आणि अचल दोन्ही असू शकते. ही संपत्ती वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येते.
advertisement
इतर संबंधित बातमी :
Location :
Latur,Maharashtra
First Published :
December 09, 2024 2:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur Waqf Board : वक्फचा शेकडो एकर जमिनीवर दावा प्रकरणात मोठा ट्वीस्ट, समोर आली मोठी अपडेट...


