Latur Flood: लातूरमध्ये पावसाचं तांडव, नदी-नाल्यांना पूर; 10 जणांची सुटका, सैन्याला पाचारण
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Latur Flood: लातूरमध्ये मुसळधार पाऊस झाला असून धरणे 100 टक्के भरली आहेत. नदीला पूर आल्याने परिस्थिती गंभीर असून 10 जणांना वाचवण्यात यश आलंय.
लातूर: मराठवाड्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लातूर जिल्ह्यात सर्वच धरणे 100 टक्के भरली असून त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शिरूर, अनंतपाळ आणि अहमदपूर तालुक्यात पूरपरिस्थिती गंभीर असून पुरात अडकलेल्या 10 जणांची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरिकांनी यशस्वीपणे सुटका केली.
अहमदपूर तालुक्यातील मौजे काळेगाव येथील साठवण तलावाच्या सांडव्यावर एकजण अडकला होता. या एका व्यक्तीची प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिकांच्या मदतीने सुटका करण्यात आली. शिरूर अनंतपाळ येथे नदीकाठावरील शेडमध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
advertisement
शिरूर अनंतपाळ जवळील घरणी नदीवरील पुलाच्या बांधकामादरम्यान पाण्यात अडकलेल्या तीन मजुरांना स्थानिक पथकाच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तसेच, मौजे माकणी येथे गावाजवळील पुलावरून जाताना पाण्यात वाहत गेलेल्या दौलत गोपाळ डोंगरगावे यांना स्थानिक गावकऱ्यांनी वाचवले.
सैन्याला पाचारण
लातूरमधील काही तालुक्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय सैन्याचे एक पथक लातूरला पाचारण करण्यात आले आहे. हे पथक अहमदपूर येथे दाखल होणार आहे.
advertisement
जिल्ह्यातील 49 रस्ते बंद
लातूरमधील धरणे पूर्णपणे भरली असून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 49 रस्ते हे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले आहे.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Aug 29, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur Flood: लातूरमध्ये पावसाचं तांडव, नदी-नाल्यांना पूर; 10 जणांची सुटका, सैन्याला पाचारण










