जरांगेला संविधान मान्य नाही, झुंड गोळा करून हुकूमशहाप्रमाणे वागतोय, लक्ष्मण हाके यांचा हल्लाबोल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Laxman Hake: मराठा समाजाचा समावेश जर ओबीसी प्रवर्गात केला तर ओबीसी आरक्षण संपून जाईल, अशी भीती ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : मनोज जरांगे हा व्यक्ती संविधानाला मानत नाही. झुंड गोळा करून तो हुकूमशहाप्रमाणे वागतोय. जरांगेच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणूनच तो ओबीसीमधून आरक्षण मागत आहे. मराठा समाजाचा समावेश जर ओबीसी प्रवर्गात केला तर ओबीसी आरक्षण संपून जाईल, अशी भीती व्यक्त करीत सर्व सरकार काय करणार आहे? सरकारला ओबीसी आरक्षण संपवायचे आहे का? असा सवाल ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विचारला.
इतर मागास प्रवर्गातूनच मराठा आरक्षण हवे, अशी मागणी करून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात ठाण मांडून आहे. न्या. शिंदे समितीसोबत चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर सरकारसमोर झुकणार नसल्याचा इशारा पत्रकार परिषदेतून जरांगे पाटील यांनी दिला. या सगळ्या घडामोडीनंतर ओबीसी बांधव आणि आंदोलकही आक्रमक झाले आहेत.
advertisement
लक्ष्मण हाके म्हणाले, जरांगेच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे, ओबीसीमधून आरक्षण मागत आहे. जरांगे उद्या पाणी त्याग करेल नाही तर अजून काही करेल पण संविधान न मानणारा, न्यायालयाच्या निर्णयाला न मानणारा, शासन प्रशासनाला न मानणारा हा माणूस लोकशाहीच्या विरोधात वागत आहे. झुंड गोळा करून एखाद्या हुकूमशहाप्रमाणे हा माणूस वागत आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगत होतो की या माणसाला मुंबईकडे येऊ देऊ नका. या माणसाचा इतिहास दंगलीचा आहे. या माणसाला संविधान कळत नाही. या माणसाला कायदा आणि लोकशाही देखील कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून हा माणूस माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करत आहे, ओबीसी बांधव चिंतेत आहेत
advertisement
मनोज जरांगे येडपट आहे. याच्या अशा वागण्याने ओबीसी आरक्षण संपेल अशी भीती वाटत आहे. सर्व मंत्र्यांना आमदारांना आमचा सवाल आहे की तुम्हाला ओबीसीचे आरक्षण संपवायचं आहे का? जरांगेला जे पाठिंबा देत आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 31, 2025 4:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जरांगेला संविधान मान्य नाही, झुंड गोळा करून हुकूमशहाप्रमाणे वागतोय, लक्ष्मण हाके यांचा हल्लाबोल










