Maharashtra Exit Poll : राणे-तटकरेंची प्रतिष्ठा पणाला, कोकणात कुणाला धक्का? Exit Poll ने वाढवलं टेन्शन

Last Updated:

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशातलं सगळ्यात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातलं चित्र स्पष्ट झालं आहे.

राणे-तटकरेंची प्रतिष्ठा पणाला, कोकणात कुणाला धक्का? Exit Poll ने वाढवलं टेन्शन
राणे-तटकरेंची प्रतिष्ठा पणाला, कोकणात कुणाला धक्का? Exit Poll ने वाढवलं टेन्शन
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशातलं सगळ्यात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातलं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. कोकणातल्या दोन जागांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे तर रायगडमधून सुनिल तटकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
नारायण राणे यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि तत्कालीन खासदार विनायक राऊत यांचं आव्हान आहे. तर रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंचा सामना शिवसेना उद्धव ठाकरेंच्या अनंत गिते यांच्याशी झाला.
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलमध्ये कोकणातल्या 3 जागांमध्ये कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. या लढतींमध्ये महायुतीला 1 ते 3 तर महाविकासआघाडीला 0 ते 2 जागा मिळू शकतात.
advertisement
महाराष्ट्रात महायुतीची सरशी
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 ते 22 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा मिळेल, असा अंदाज आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात. यात काँग्रेसला 6 ते 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
advertisement
नरेंद्र मोदींची हॅट्रिक
न्यूज 18 च्या या मेगा एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी हॅट्रिक करताना दिसत आहेत. एनडीएला 543 पैकी 355 ते 370 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला 125 ते 140 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. याशिवाय इतर पक्षांना 42 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Exit Poll : राणे-तटकरेंची प्रतिष्ठा पणाला, कोकणात कुणाला धक्का? Exit Poll ने वाढवलं टेन्शन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement