Ahmadnagar Loksabha : लंके की विखे; नगर लोकसभेचा ग्राऊंड रिपोर्ट, धडकी कुणाला भरणार?
- Published by:Shreyas
Last Updated:
महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांच्या पाचही टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांमधल्या काही हाय व्होल्टेज लढतींमध्ये नगर दक्षिणच्या जागेचा समावेश होता.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहमदनगर : महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांच्या पाचही टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांमधल्या काही हाय व्होल्टेज लढतींमध्ये नगर दक्षिणच्या जागेचा समावेश होता. राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीवर नजर टाकल्यास महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके, या दोघांनाही धडकी भरू शकते. याच कारणही तसंच आहे, विखेंचा प्रभाव असलेल्या शेवगाव-पाथर्डी, राहुरी, नगर शहर, श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघात आणि लंकेंचा गड असलेल्या पारनेर तसंच मविआचे आमदार असलेल्या रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 2019 च्या तुलनेत वाढली आहे. या सर्व ठिकाणी वाढलेला मतदारांचा टक्का कोणाच्या पारड्यात पडतो, यावर सर्वकाही अवलंबून असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
advertisement
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये 13 तारखेला मतदान झालं, चार जूनला त्याचा निकाल लागणार आहे. मात्र यावेळची निवडणूक थोडी वेगळी होती. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन पक्ष झाले, तशीच अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे. दोन पक्षांचे चार पक्ष झाल्यामुळे मतांचं विभाजन बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने खासदार डॉक्टर सुजय विखे यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करत माजी आमदार निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधात शड्डू ठोकला, त्यामुळे ही निवडणूक राज्यात लक्षावधी ठरली. मागच्या वेळेस विरोधात लढलेले संग्राम जगताप आणि सुजय विखे या निवडणुकीत एकत्र प्रचार करताना दिसले, या निवडणुकांमध्ये 1991 नंतर प्रथमच मतदानात वाढ झाली आहे, त्यामुळे वाढत्या मतदानाचा फटका कुणाला बसणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
कुठे किती मतदान वाढलं?
पारनेर - 2019 - 66.87 टक्के, 2024 - 70.13 टक्के, 3.26 टक्के वाढ
राहुरी - 2019 - 97.78 टक्के, 2024 - 70 टक्के, 2.22 टक्के वाढ
श्रीगोंदा - 2019 - 65.19 टक्के, 2024 - 67.90 टक्के, 2.71 टक्के वाढ
कर्जत - जामखेड - 2019 - 64.66 टक्के, 2024 - 66.61 टक्के, 1.95 टक्के वाढ
advertisement
नगर शहर - 2019 - 61.42 टक्के, 2024 - 62.50 टक्के, 1.08 टक्के वाढ
शेवगाव- 2019 - 64.41 टक्के, 2024 - 63.03 टक्के, 1.38 टक्के वाढ
निवडणुकीतले मुद्दे
या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने कांदा, दूध दरवाढ, गुंडगिरी एमआयडीसी आणि लक्ष्मी दर्शन हे मुद्दे प्रामुख्याने गाजले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये पारनेर, राहुरी, कर्जत जामखेड यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे साहजिकच त्या नेत्यांचं प्राबल्य यातील मतदारसंघामध्ये आहे. दुसरीकडे श्रीगोंदा, नगर शहर आणि राहुरीवर या मतदार संघावर विखेंनी खास करून लक्ष केंद्रित केलं होतं.
advertisement
2019 च्या तुलनेत शेवगाव, पाथर्डी, भगता, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत जामखेड आणि राहुरी मतदारसंघांमध्ये टक्केवारी वाढली आहे. या निवडणुकीत शेतकऱ्यांचे मुद्दे चर्चेत आले, मात्र नंतर वैयक्तिक आरोपांवरती ही निवडणूक फिरली, त्यामुळे मतदारांनी कुणाला मतदान केलं हे सांगणं सध्यातरी अवघड आहे.
पारनेर मतदार संघ निलेश लंके यांचं होमपिच असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल. कर्जत जामखेडमध्येही रोहित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर राहुरी मतदारसंघांमध्ये प्राजक्ता तनपुरे हेही राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांमध्ये माजी आमदार निलेश लंके यांना फायदा होऊ शकतो. तर नगर शहरामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आहेत, श्रीगोंदामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांचं वर्चस्व आहे तर पाथर्डी शेवगाव मतदार संघामध्ये भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांचा वर्चस्व आहे. त्यामुळे या ठिकाणी खासदार सुजय विखे यांना मदत होईल. या निवडणुकीत कोण निवडून हे स्पष्टपणे कुणीही सांगू शकत नाही, त्यामुळे नगरचा खासदार कोण याची आपल्याला चार तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
May 24, 2024 5:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahmadnagar Loksabha : लंके की विखे; नगर लोकसभेचा ग्राऊंड रिपोर्ट, धडकी कुणाला भरणार?


