Maharashtra Elections Pune : राष्ट्रवादी पवार गटाच्या माजी नेत्याच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला, कारण काय?

Last Updated:

Maharashtra Elections : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे माजी युवा नेते सुरज वाजगे यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केली असल्याचे समोर आले आहे. हल्ला राजकीय वैमानस्यातून झाल्याची चर्चा सुरू आहे.

जुन्नरमध्ये राष्ट्रवादी पवार गटाच्या माजी नेत्याच्या कारवर हल्ला, अपक्ष उमेदवाराला दिलाय पाठिंबा
जुन्नरमध्ये राष्ट्रवादी पवार गटाच्या माजी नेत्याच्या कारवर हल्ला, अपक्ष उमेदवाराला दिलाय पाठिंबा
रायचंद शिंदे, जुन्नर, पुणे :  निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे काही घटनांमुळे तणावांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना जुन्नरमध्ये समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे माजी युवा नेते सुरज वाजगे यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केली असल्याचे समोर आले आहे. हल्ला राजकिय वैमानस्यातून झाल्याची चर्चा सुरू आहे. सूरज वाजगेनी शरद पवार गटाची साथ सोडून अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे यांना पाठिंबा दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे माजी युवा नेते सुरज वाजगे यांच्या कारवर गुरुवारी रात्री 10 च्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत दोन अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत वाजगे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र चालक आणि वाजगे यातून सुखरूप बचावले आहेत. सूरज वाजगे गुरुवारी रात्री जुन्नरवरून नारायणगावकडे प्रवास करत होते. त्या वेळी हा हल्ला झाला.
advertisement
माजी आमदार अतुल बेनके यांचे घनिष्ट संबंध असलेले वाजगे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर शरदचंद्र पवार गटात सामील झाले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे काम केले होते. तर आता विधानसभा निवडणुक त्यांनी आपल्या पक्षाची साथ सोडून अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा हल्ला राजकीय वैमनस्स्यातुन झाल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी डॉ.अमोल कोल्हे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांनी तातडीने भेट देऊन वाजगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. या पुढील अधिकचा तपास जुन्नर पोलीस करत आहेत.
advertisement
या घटनेमुळे जुन्नरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता परिस्थिती नियंत्रणात असून या हल्ल्यामागील आरोपी आणि सूत्रधार शोधून काढण्याचे आवाहन जुन्नर पोलिसांसमोर आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Pune : राष्ट्रवादी पवार गटाच्या माजी नेत्याच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला, कारण काय?
Next Article
advertisement
Eknath Shinde Shiv Sena:  महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय सांगतात
महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय
  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

View All
advertisement