Maharashtra Elections 2024 NCP Candidate List : राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर, अखेरच्या क्षणी कोणाला मिळाली संधी?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आह. आपल्या चौथ्या यादीत अजित पवार गटाने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. अजित पवारांनी ठाकरे गटाच्या नेत्याला संधी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भोर आणि मोर्शी मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले.
ठाकरे गटाच्या नेत्याला संधी...
भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. सन 2005 च्या विधानसभेपर्यंत या मतदार संघात भोर व राजगड (वेल्हे) तालुक्याचा समावेश होता. मात्र 2009 मधील पुनर्रचनेनंतर मुळशी तालुक्याच्या समावेशाने 'भोर-राजगड (वेल्हा) मुळशी' असा नवा मतदार संघ झाला. शंकर मांडेकर हे मुळशी तालुक्यातील आहेत. मांडेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते. मात्र पक्षांतर्गत कारवाईमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांची भेट घेतली राष्ट्रवादी कडून आज त्यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली.
advertisement
Nationalist Congress Party (NCP) announces names of 2 more candidates for #MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/cYImfPvzkO
— ANI (@ANI) October 29, 2024
मुळशी तालुक्यातील सर्व समावेशक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मागील पाच वर्षात भोर वेल्हा तालुक्यात जनसंपर्क वाढविला विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचले आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत किती होईल, हे निकालात दिसून येईल.
advertisement
देवेंद्र भुयारांना संधी
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने अमरावतीमधून मोर्शीतून उमेदवारी जाहीर केली आहे. देवेंद्र भुयार हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत असणारे भुयार यांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांना साथ दिली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 29, 2024 9:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 NCP Candidate List : राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर, अखेरच्या क्षणी कोणाला मिळाली संधी?










