Maharashtra Elections : बिहारमधील पक्षामुळे महाराष्ट्रातील पक्ष अडचणीत, ऐन निवडणुकीत पक्षाचं चिन्हच गेलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections Bahujan Vikas Aghadi : या आठवड्यापासून निवडणूक प्रचाराला धार येणार आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या राजकीय पक्षाला धक्का बसला आहे.
विजय देसाई, प्रतिनिधी, विरार : राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या आठवड्यापासून निवडणूक प्रचाराला धार येणार आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या राजकीय पक्षाला धक्का बसला आहे. राज्याच्या मावळत्या विधानसभेत 3 आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे निवडणूक चिन्ह जनता दल युनायटेड पक्षासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी आता बहुजन विकास आघाडीला नव्या निवडणूक चिन्हावर प्रचार करावा लागणार आहे.
बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्ह्यात चांगलाच जोर आहे. जिल्ह्यातील 6 पैकी तीन आमदार बविआचे आहेत. बविआचा प्रभाव वसई, नालासोपरा, विरार सारख्या शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आहे. बहुजन विकास आघाडी 'शिट्टी' या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असे. आता, हे निवडणूक चिन्ह आता बिहाचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या जनता दल युनायटेडसाठी यांच्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला संताप...
निवडणूक चिन्ह गेल्याने हितेंद्र ठाकूर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, एवढ्या खालच्या दर्जाचे राजकारण कुणी करु नये, ज्यांना हरण्याची भीती आहे. तेच लोक असा डाव खेळतात, असेही त्यांनी म्हटले. सध्या राजकारण सुरू असून मुद्दाम अशा गोष्टी केल्या जात असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले. चोरीचे, पळवापळवीच्या गोष्टीचा लोकांना विसर पडला होता. आता मात्र, या घटनेने विसरुन गेलेल्या गोष्टी लोकांना पुन्हा स्मरणात येतील, असेही ठाकूर यांनी म्हटले.
advertisement
हितेंद्र ठाकूर म्हणतात, तरीही आम्हीच जिंकू...
शिट्टी हे निवडणूक चिन्ह गेल्याने बहुजन विकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र या अडचणीवर आम्ही मात करून विजय मिळवू असा विश्वास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मिळालेले नवीन निवडणूक चिन्ह एका दिवसात लोकांच्या घरात पोहचवतील असेही त्यांनी म्हटले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 03, 2024 1:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : बिहारमधील पक्षामुळे महाराष्ट्रातील पक्ष अडचणीत, ऐन निवडणुकीत पक्षाचं चिन्हच गेलं











